भड़गाव प्रतिनिधी:
भडगाव येथील यशवंत नगर ऊर्दू शाळेत दिनांक 11 व 12 मार्च रोजी तालुकास्तरीय "शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कुमावत साहेब,यांच्या हस्ते झाले .यावेळेस मार्गदर्शक एकनाथ गोफणे.किसन सुर्यवंशी. जि.प. ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक तसेच पं. स.चे विषय तज्ञ उपस्थित होते. दोन दिवशीय प्रशिक्षणात निपूण भारत अभियान
अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ,आर्थिक व्यवहार ,गुणवत्तापूर्ण शिक्षण ,इतिवृत लेखन,सामाजिक अंकेक्षण,शालेय आपत्ती व्यवस्थापन ,
बालकांचे हक्क व सुरक्षितता ,शाळा व्यवस्थापन समिती आदी विषयांवर मार्गदर्शक एकनाथ गोफणे.किसन सुर्यवंशी. यांनी सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
सहभागी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी गटकार्य व त्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकन उगले सर यांनी केले..यावेळी लक्ष्मण खैरनार,विनायक मोरे,विरेंद्र राजपूत सर यांनी मनोगत व्यक्त केले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकन उगले सर यांनी केले. विषयतज्ञ श्री. माळी यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या