पालघर मध्ये पार्किंग केलेल्या दुचाकींना भीषण आग दहा दुचाकी जळून खाक .बोईसरमध्ये ही स्कूल बसने घेतला पेट. अग्निशामक दलांना आग नियंत्रणात आणण्यात यश!
प्रतिनिधि : हेमंत घाटाळ
पालघर : पालघर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत एक बस व दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला(Fire in Palghar! Ten bikes burn to ashes; The school bus also took a beating).
सकाळच्या वेळी बोईसर येथील नवापूर नाक्याजवळ उभ्या असलेल्या स्कूल बसला अचानक आग लागल्याने बस आगीत जळून खाक झाली आहे. सुदैवाने बस रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची अधिकृत माहिती घेण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलीस ठाण्यामध्ये दुपारपर्यंत कुणीही माहिती दिली नव्हती, त्यामुळे सदर बस कोणाची आहे? तेथे का पार्क करून ठेवली होती? कुठल्या शाळेची होती? तसेच आगीचे निश्चित कारण काय? हे काहीही अधिकृतपणे समजू शकले नाही.
सकाळी साडेदहाच्या सुमारास पालघर पूर्वेकडील रेल्वे पादचारी पुलाच्या जवळपास मुख्य रस्ता असलेल्या ठिकाणी कामानिमित्त बाहेरगावी जाणारे नोकरदार वर्ग गाड्या ठेवून कामाला जात असतात. या भागात सुमारे २०० ते २५० दुचाकी रस्त्याच्या दुतर्फा दररोज उभ्या असतात. रस्त्याच्या बाजूला असलेल्या पडीक जागेत गवताला आग लागली होती, ती हळूहळू आग पसरली व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीपर्यंत पोहोचली. या यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी काही दुचाकी बाजूला केल्या तरीही दहा दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. दोन दुचाकी किरकोळ जळाल्या आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले
अवैध पार्किंगकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष
पालघरकडील आग वेळीच विझवण्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांना सांगितले. रोज तिथे २०० ते २५० गाड्या अनधिकृतपणे पार्किंग करून ठेवलेल्या असतात. त्या तिथे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून अनधिकृत पार्किंगमुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांना देखील याचा त्रास होत आहे. वेळोवेळी नगरपरिषदेकडे बेकायदेशीरपणे उभारणाऱ्या दुचाकी विषयी कळवले असले तरी नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
.तर अनर्थ टळला असता
अग्निशमन दल वेळीच आले नसते तर इतर गाड्यापर्यंत ही आग पोचली असती. तर तिथे राहत असलेल्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला असता. नगरपरिषदेने वेळीच अनधिकृत पद्धतीने दुचाकी ठेवणाऱ्यांवर कारवाई केली असती तर हा झालेला अनर्थ टाळता आला असता, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या