महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आयोजनाने विक्रमगडमध्ये 1100 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर
विक्रमगड - दि. 13/03/2022 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आयोजनाने विक्रमगड जि.पालघर येथे 1100 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा संपन्न करण्यासाठी मनसेचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.अविनाशजी जाधव यांच्या नियोजनाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी सौ.शर्मिलाताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याप्रसंगी राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिजाऊ सामाजिक,शैक्षणिक संस्था - झडपोलीचे अध्यक्ष मा.श्री.निलेशजी सांबरे साहेब यांची विशेष उपस्थिती होती.
सध्या ग्रामीण भागात लग्न म्हटलं की पैश्याची उधार - उसनवरी करून प्रसंगी कर्ज काढून लग्न केली जातात. लग्न झाल्यानंतर पुढील बरीच वर्षे हे कर्ज फेडाण्यातच विवाहित जोडप्यांची निघून जातात ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष मा.श्री.अविनाशजी जाधव यांच्या आल्यावर मागील काही वर्षांपासून त्यांनी त्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली असून सध्या ते अनेक ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून लग्नातील होणारा खर्च वाचवत आहेत.हाच वाचलेला पैसा विवाहित जोडप्यांना पुढील आयुष्यात उपयोगात येतो.
मनसेने सदर विवाह सोहळ्याचे नियोजन मागील वर्षीच केले होते ; मात्र कोविड -19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने हा विवाह सोहळा पुढे ढकलावा असे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने मनसेने अंतिम टप्प्यात आलेला विवाह सोहळा तात्काळ रद्द करून पुढे ढकलला होता.हाच रद्द करावा लागलेला सामुदायिक विवाह सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दि.13/03/2022 रोजी मोठया उत्साहाने आणि थाटामाटात साजरा करून यशस्वीपणे संपन्न करून दाखविला आहे.
हा भव्य- दिव्य सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठीसाठी जव्हारचे मनसे तालुका अध्यक्ष - श्री.गोपाळ वझरे,मोखाडा तालुका अध्यक्ष - निलेश फुफाणे यांच्यासह मनसेचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मा.श्री.अविनाशजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वात दिवस- रात्र मेहनत घेत होते.
या विवावास वधुवरांस पोशाख,संसारउपयोगी साहित्य,विवाह ठिकाणी जाण्यायेण्यासाठी बस व्यवस्था आणि विवाहात सहभागी असणाऱ्या हजारो नागरिकांची भोजनाची व्यवस्था केली होती. तसेच दर्जेदार साउंड सिस्टम,प्रशस्त स्टेज व आसनव्यवस्था,सुरक्षिततेसाठी उत्तम बॅरिकेट्स आणि नागरिकांना बसण्याची हजारो खुर्च्यांची व्यवस्था केली होती.पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्तात सुव्यवस्थितपणे हा भव्य- दिव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित विवाह सोहळ्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या