भटके विमुक्त जमातीचे सर्व पक्षीय आमदार एकवटले विधानभवनात

 भटके विमुक्त जमातीचे सर्व पक्षीय आमदार एकवटले विधानभवनात


दि.१२. विमुक्त भटक्या जमाती प्रर्वगातील  पदोन्नती आरक्षण बाबत  आज मुंबई येथील विधानभवनात कक्ष 42  येथे महाराष्ट्र राज्याचे मा.कॅबिनेट वनमंञी आ.संजयभाऊ राठोड (शिवसेना) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मुखेड कंधार मतदार संघातील आमदार डॉक्टर तुषार राठोड,  (भारतीय जनतापार्टी)   हरिभाऊ राठोड,  (माजी आमदार,खासदार)   राजेश राठोड, (कॉग्रेस)  बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ.टि.सी.राठोड, यांच्यासह  भटक्याविमुक्त जमातीचे महाराष्ट्र्रातील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 या मिटींग साठी  महाराष्ट्र सरकार मधील भटक्या विमुक्त जमाती चे आजी व माजी आमदार ,मंत्री, यांनाही भटक्याविमुक्त जमातीच्या आरक्षण या मुद्यावर विधानभवनात बोलविले होते , मात्र काही कारणास्तव काही आमदार उपस्थित राहू शकले नाही यात बंजारा, वंजारी, धनगर, समाजाचे मुख्यता आमदार आहेत. मात्र त्यांनी भटक्याविमुक्त जमाती साठी सोबत असल्याची हमी त्यांनी दिली , यावेळेस भटकेविमुक्त जमातीचे आरक्षण असंविधानिक आहे असे म्हणने मुळातच चुकीचे आहे महाराष्ट्र्रात असलेला 2004 चा कायदा अजून कोणत्याच कोर्टाने नाकारला नाही त्यामुळे हे आरक्षण असंविधानिक आहे असे म्हणून कोर्टाचा अपमान करणे आहे असे मत सर्वानुमते मांडण्यात आले, कोर्टाच्या केस ची भूमिका समजून घेतील गेली , आणि पुढे या केस साठी शासकीय वकील म्हणून वरिष्ठ वकील करावा व VJNT च्या केस साठी प्रायव्हेट मध्ये ही जेष्ठ आणि नामांकित वकील उभा करावा  अशी भूमिका घेण्यात आली, त्यावेळेस मुख्यमंत्री मोहदय यासाठी  निवेदन तयार केल्या गेले व  मा.मुख्यमंत्री मोहदयाची वेळ मिळताच त्यांना आजच किंवा उदया भेटण्याचा निर्णय घेण्यात आला त्या सोबत  मा. राज्यपाल मोहदय ची भेट घेवून त्यांनाही  निवेदन देण्याचे ठरले जर सरकार कोणतीही कारवाई करत नसेल तर भव्य आंदोलन महाराष्ट्र मध्ये   करण्याचा मानस ही  सर्वानुमते घेण्यात आला.


या वेळी मुकुंद अडेवार , राजू चव्हाण , आकाश जाधव, संतोष जाधव आणि महाराष्ट्रातील भटकेविमुक्त जमातीचे मुख्य संयोजक, मागासवर्गीय संघटनेचे अधिकारी विशेष करून उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या