तक्षशिला विद्यालय (माध्य.)व ज्युनिअर कॉलेज - उल्हासनगर -04 मध्ये इयत्ता 11 वी विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा...

 तक्षशिला विद्यालय (माध्य.)व ज्युनिअर कॉलेज - उल्हासनगर -04 मध्ये इयत्ता 11 वी विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा...


मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर

         आज दि.12/10/2021 रोजी सकाळी 10:00 वाजता *तक्षशिला विद्यालय (माध्य.)व ज्युनिअर कॉलेज - उल्हासनगर -04 मध्ये इयत्ता - 11 वी मधील आर्ट्स,कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.* कोविड -19 च्या परिस्थितीमुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरु होते. असे असले तरी ऑनलाईन शिक्षणात स्मार्टफोनचा अभाव, पालकांची बेताची परिस्थिती व तांत्रिक कारणास्तव अध्ययन - अध्यापन प्रकियेमध्ये बऱ्याचदा अडचणी व मर्यादा येत होत्या.

          महाराष्ट्र शासनाने कोविड - 19 च्या नियमांचे पालन करून शहरी भागात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आणि शाळा सुरु झाल्या. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. त्याअनुषंगाने आज 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रकिया अंतिम टप्प्यात आल्यामुळे ऍडमिशन झालेल्या 11 वी च्या विद्यार्थ्यांचे वर्ग तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु करण्यात आले.

        कॉलेजचे 11वी चे वर्ग सुरु झाल्यामुळे *विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा उत्साह कायम राहावा म्हणून ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या मा.सुनंदा गाडगे मॅडम व पर्यवेक्षक श्री.रविंद्र कोळी सर यांनी 11 वीचा प्रवेश उत्सव आयोजित केला होता.* कार्यक्रम प्रसंगी प्राचार्या सौ.सुनंदा गाडगे मॅडम व पर्यवेक्षक श्री.रविंद्र कोळी सर यांनी विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करून त्यांना शिक्षण आणि शिस्तीचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना त्यांनी व विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.वाघ सर गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांमुळे विद्यार्थी आनंदीत व उत्साहीत झाले होते.त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद नक्कीच बघण्यासारखा होता.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तक्षशिला विद्यालयाच्या सांस्कृतिक प्रमुख सौ.आरती राठोड मॅडम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे शिक्षक श्री.रामदास गाडर सर,श्री.अमर सोनवणे सर,कु.स्वप्नील वाठोरे सर, सौ. सुदर्शिनी डोंगरे मॅडम कु.अश्विनी जगताप मॅडम,कु.करुणा मॅडम आणि श्री.मारुती शेंडगे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी श्री. रामदास गाडर सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या