खान्देशातील आंबेडकरी चळवळ या ग्रंथाचे प्रकाशन व चर्चासत्राचे रविवारी चाळीसगावात आयोजन

 खान्देशातील आंबेडकरी चळवळ या ग्रंथाचे प्रकाशन व चर्चासत्राचे रविवारी चाळीसगावात आयोजन

----------------------------------------------------

 समाज प्रबोधीनी बहुउद्देशीय संस्था,चाळीसगाव आयोजित " खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-१" (संपादक प्रा. गौतम निकम,प्रा. डॉ. सतीश मस्के, डी.एस.घोडेस्वार,प्रतापराव सांळुखे, बाबुराव वाघ व कल्पतेश देशमुख ) या ग्रंथाचे प्रकाशन व आंबेडकरी चळवळ काल,आज आणि उद्या या विषयावरील चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी रविवारी चाळीसगाव येथील राजपूत मंगल कार्यालयात सकाळी ठीक 10:00 वाजता जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, लेखक मा.ज.वि.पवार(मुंबई), यांच्या हस्ते व मा.सुबोध मोरे(विचारवंत, मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉ. भी.ना. पाटील (पाचोरा) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत "खानदेशातील आंबेडकरी चळवळ खंड -१"या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

 दुपारच्या सत्रात 'उद्याची आंबेडकरी चळवळ' या संदर्भातील काही महत्त्वाच्या प्रश्‍नावर चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले आहे.या चर्चासत्रात कॉ.सुबोध मोरे(मुंबई), प्रा. डॉ. देवेंद्र इंगळे (जळगाव), मा.दिलीप चव्हाण, प्रा. डॉ. राजश्री पगारे (नाशिक) व प्रा. डॉ. संबोधी देशपांडे ( चोपडा) प्रा. डॉ. देवकुमार अहिरे ( पुणे) इ. मान्यवर सहभागी होणार आहेत.तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समाज प्रबोधीनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या