पोलीस पाटील संघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. गोदावरी ताई शिंदे पाटील यांची निवड
प्रतिनिधी : राम शिंदे
दिनांक 11 जुलै रोजी परभणी येथे महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सौ. गोदावरी शिवाजीराव शिंदे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
पोलीस पाटील संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री कृष्ण साळुंखे पाटील उपस्थित होते यांच्या हस्ते सर्वानुमते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
बैठकीमध्ये यावेळी जब्बार पठाण साहेब मराठवाडा अध्यक्ष, गोरख टेमकर राज्य सहसचिव, संभाजी पाटील मांडगिर जिल्हा सचिव नांदेड, नूतन जिल्हाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, दाजी सोळंके पाटील तालुकाध्यक्ष गंगाखेड, ज्ञानराज लोळे पाटील, कदम पाटील, कोलते पाटील, काळे पाटील पाथरी, सौ अनिता गायकवाड, सौ सुवर्णा राठोड, समाज सेवक नामदेवराव शिंदे, शिवाजीराव शिंदे पाटील जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील संघाच्या न्याय हक्कासाठी व संघ वृद्धीगंत करण्यासाठी व सदैव प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन नुतन महिला जिल्हाध्यक्ष सौ गोदावरी ताई शिंदे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अर्जुन दुबे पाटील यांनी केले.
0 टिप्पण्या