प्रतीनीधी : योगेश (विकास) आल्हाट
भोसरी : चारित्र्याच्या संशयातुन भर रस्त्यात पत्नीचा गळा चिरून खुण पती पोलीसात हजर
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा चिरून खून करण्यात आला हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली हडपसर परिसरातील बंटर बर्नाड शाळेजवळ हा प्रकार घडला .
अंजली नितीन निकम (वय 22 राहणार चक्रपाणी वसाहत भोसरी )असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे याप्रकरणी पती नितीन निकम ( रा .चक्रपाणी वसाहत भोसरी मुळगाव दहिगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर )याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा वर्षापूर्वी या दोघांचे लग्न झाले होते त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे नितीन निकम हा भोसरीतील एका कंपनीत इलेक्ट्रिशियन चे काम करतो पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून त्या दोघा नवरा बायको मध्ये नेहमी भांडणे होत होती
आज दुपारी देखील त्यांच्यात याच कारणावरून भांडण झाले त्यानंतर दोघेही दुचाकीवरून दहेगाव येथे जाण्यासाठी निघाले यावेळी त्यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले नितीन निकम याने भर रस्त्यात दुचाकी थांबवून गळा चिरून पत्नी अंजली चा खून केला
दरम्यान खुन केल्यानंतर नितीन निकम हा आत्महत्या करण्यासाठी निघाला होता तत्पूर्वी त्याने भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि स्वतः आत्महत्या करत असल्याचे सांगितले परंतु भावाने त्याला मुलाचे कारण पुढे करून आत्महत्या करू नको असे सांगितले या सर्व प्रकारानंतर नितीन निकम स्वतः हडपसर पोलिस ठाण्यात गेला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला
हडपसर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे
0 टिप्पण्या