विक्रमगड तालुक्याला मुसळधार पावसाने जोरदार झोडपले.

 विक्रमगड तालुक्याला मुसळधार पावसाने जोरदार झोडपले.


शेवते महालपाडा व भडांगेपाडा येथे पुराचे पाणी गावात घुसले.


विक्रमगड प्रतिनिधी : रोहित गावित

गेल्या तीन दिवसांत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने पालघर जिल्ह्यातील  विक्रमगड तालुक्यात विक्रमी नोंद केली आहे.तहसील कार्यालयात १३० मि. मि. पावसाची नोंद झाली असूनअश्या पावसाने तालुक्यातील सर्व नदया नाल्यानां महापुर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर खांड, सजन मिनी डॅम ओव्हर फ्लो झाले आहेत. सततच्या पडणाऱ्या पावसाने तालुक्यातील छोटे मोठे पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तर काही नदी काठच्या व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील देर्हेजे नदीला महापूर आल्याने शेवते महालपाडा व भडांगेपाडा ह्या गावात पुराचे पाणी घुसल्याने येथील जनतेची तारांबळ उडाली होती. तसेच घरांत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झालेअसल्याचे समजते. तसेच शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान शुद्धा झाले आहे. पाऊस उघडताच नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी येथील शेतकरी करत आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या