चाकण : मुख्य रस्त्यावरील एटीएम स्फोट करून फोडले.
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
चाकण एमआयडीसी परीसरातील भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजुला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करूण फोडले . एटीएम मधुन रोख रक्कम चोरून नेली असुन नेमकी किती रक्कम चोरीला गेली. याबाबत माहीती मिळू शकली नाही . ही घटना आज (बुधवार, दि. 21 ) मध्यरात्री घडली.
मिळालेल्या माहीती प्रमाणे , चाकण मधील महाळुंगे पालीस चौकीच्या हद्दीत भांबोली येथे मुख्य रस्त्यालगत हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला एटीएम फोडताना स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला . त्यामध्ये एटीएमचे मोठे नुकसान झाले.
स्फोट घडवुन चोरट्यांनी एटीएम मधुन रोकड चोरून नेली. घटनेची माहीती मिळताच महाळुंगे पोलीस तसेच गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहीती मिळू शकली नाही .
0 टिप्पण्या