जळकोट तालुक्यात शिव संपर्क अभियानाअंतर्गत बैठका संपन्न झाली.

 जळकोट तालुक्यात शिव संपर्क अभियानाअंतर्गत बैठका संपन्न झाली.

प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठीमागे भाऊ म्हणून उभा आहे. जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी.


जळकोट ता. प्रतिनिधी


दि.15जुलै रोजी जळकोट तालुक्यातील वांजरवाडा पंचायत समिती गणापासून शिवसंपर्क अभियानास मा. जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या उपस्थितीमध्ये सुरवात करण्यात आले. वांजरवाडा शाखेला 21वर्ष पूर्ण झाल्याने शाखेच्या नवीन फलकाचे आलोचन करण्यात आले. जळकोट शहरांसह, वांजरवाडा , कोळंनूर, घोणशी, अतनूर, माहळीप्पंरगा, जगळपूर, गणातील प्रत्येक शाखाप्रमुखांना व शिवसैनिकांना भेट दिली.

मा.शिवसेना पक्षप्रमुख सन्मानीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार 12जुलै ते 24जुलै या दरम्यान शिवसेना प्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शनानुसार मा.जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी शिवसंपर्कअभियान गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक अभियान यशस्वी करून ,गावकरी बांधवांच्या आरोग्य, सुखी समाधानी राहण्यासाठी,जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा.गावात घरा घरात भेट देऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करा जनता तुमच्या पाठीशी खंबीर पने उभे राहतील,मी आपल्या अडचणी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या पर्यंत पोहचून न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या सोबत खंबीर पने उभा राहीन असे रेड्डी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. उपजिल्हाप्रमुख श्री.मा.प्रा रामचंद्र आदावळे सर, तालुका प्रमुख संगमेश्वर टाले, उप तालुका प्रमुख शंकरअण्णा धोंडापुरे, तालुका संघटक बालाजी ठाकूर,शहर प्रमुख मन्मथ बोधले,उमाकांत इमडे,परमेश्वर पदंमपल्ले, वांजारावडा शाखा प्रमुख,पांडुरंग परीट ,माधव गोंड, दळवे,राम गुट्टे, विष्णू कांत सोरागेकर,अरुण सोरगेकर, मनमंत भुरे,धोंडीराम गुट्टे,विभाग प्रमुख अभंग मोठे,सर्कल प्रमुख नरसिंग सोर्गेकर,सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या