चाकण : एटीएम स्फोटासाठी डिटोनेटर जिलेटीनचा वापर , 28 लाखाची रोकड लंपास

 चाकण : एटीएम स्फोटासाठी डिटोनेटर जिलेटीनचा वापर , 28 लाखाची रोकड लंपास

प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट

चाकण एमआयडीसी मधील भांबोली (ता.खेड जि.पुणे) हद्दीतील मुख्य रस्त्या लगत असलेले एटीएम मशीन अज्ञातांनी स्फोट करून फोडले . या एटीएम मधील सुमारे 28 लाखाची रककम लंपास झाल्याची माहीती महाळुंगे पोलीसांनी दिली. सदरची घटना बुधवारी (दि. 21 ) पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान घडली आहे. सदरचा स्फोट डीटोनेटर जिलेटीनच्या साह्याने दोघांनी घडवुन आणला आहे. मात्र त्यात आणखी कोणती स्फोटके वापरण्यात आली याचा तपास सुरू आहे.


या बाबतची अधिक माहिती अशी की, भांबोली ता.खेड गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्याच्या लगत हिताची कंपनीचे एटीएम आहे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास येथे आलेल्या अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मधील पैसे काढण्यासाठी चोरट्यांनी स्फोट घडवुन आणला आहे . या स्फोटामध्ये मशीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . स्फोट घडवुन चोरट्यांनी एटीएम मधील रक्कम लंपास केली . 


घटनेची माहीती मिळताच महाळुंगे पोलीस चौकीचे पथक , गुन्हे शाखेचे पथक व श्वान पथक घटनास्थळी पोहचले हिताची कंपनीच्या एटीएम मधुन 28 लाख रुपये पळवण्यात चोरटे यशस्वी झाले. तर मशीनच्या फुटलेल्या भागात 10 ते 11 लाख रुपये सुरक्षीत राहीले असल्याचेही पोलीसानी सांगीतले एटीएम मशीन जवळ करण्यात आलेल्या स्फोटाची पोलीस चौकशी सुरु आहे.


डीटोनेटर जिलेटीनच्या सहयाने बॅटरी व वायर लावुन सदरचा स्फोट घडवुन आणला असल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे . मात्र यात गंधक किंवा अन्य कोणती स्फोटके वापरून स्फोट करण्यात आला याचाही तपास सुरु आहे. पोलीसांनी पारिसरात किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याचा आढावा घेऊन त्या सर्व कॅमेऱ्याचे फूटेज तपासण्यास सुरवात केली आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधुन चोरटयांविषयी जास्तीत जास्त माहीती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मशिन ज्या ठिकाणी आहे. त्या परिसरात  चौकशी सुरु आहे. संबधीत एटीएम वर सुरक्षारक्षक नेमलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. महाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हिताची कंपनी सहआरोपी :

सदर एटीएम सेंटरवर सुरक्षा रक्षक , आलार्म आदी सुरक्षा व्यवस्था नेमण्याच्या सुचना महाळुंगे पोलीसांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे हिताची कंपनीने आणि संबंधित ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले. त्यामुळे  हिताची  कंपनी व ठेकेदार कंपनीला चोरट्यांना सहकार्य केल्याच्या संशयातुन सहआरोपी करण्यात आले असल्याचे महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले .


असामाजिक संघटनांचा सहभाग? :

एटीएम मशिनचे लॉक तोडणे किंवा मशिनचा पत्रा कापुन आतील पैसे चोरणे कठीण असते. यामुळेच चोरट्यांनी एटीएम मशिन मध्येच स्फोट करूण मशिन उघडण्याचा प्रकार केला आहे. चोरट्यांनी मशिनचा पत्रा वाकवण्यासाठी या एटीएम मशिनजवळ स्फोट केला. स्फोटाचा मोठा आवाज झाला. आणि एटीएमचे भरपुर नुकसान झाले स्फोट केल्यानंतर चोरट्यांनी एटीएम मधील पैसे चोरून पळ काढला असे स्फोट कोण घडवु शकतात ? याचा तपास सुरु आहे


एटीएम रडारवरः

चाकण औद्योगिक परिसरातील विविध बँकांच्या एटीएम वर चोरट्यांची नजर असल्याची स्थिती गेल्या काही काळात समोर आली आहे. येथील एका घटनेत चक्क सुरक्षा  रक्षकाचा खुन करून एटीएम फोडण्यात आले होते. काही एटीएम मशिन चक्क जीपला दोरी बांधून उपसून नेण्यात आली होती . मात्र स्फोट घडवल्याची धक्कादायक घटना प्रथमच समोर आल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे सदरच्या घटनेबाबत घातपाताचा संशय देखील वर्तविला जात असल्याने पोलीसांच्या तपासाची अशा काही संघटनांच्या दिशेने फिरू लागल्याची माहीती पोलीस वर्तुळातून समोर येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या