कंपनीच्या गोडाउन मधुन 46 लाखांचे साहीत्य चोरीला

 

कंपनीच्या गोडाउन मधुन 46 लाखांचे साहीत्य चोरीला

 चाकण प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट

कंपनीच्या गोडाउनच्या पाठीमागील बाजुस असलेल्या खिडकीचे गज कापुन अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधुन 45 लाख 99 हजाराचे साहीत्य चोरून नेले. ही घटना खेड तालुक्यातील खराबवाडी येथे लुमॅक्स ॲन्सीलरी लिमिटेड कंपनीच्या गोडाउन मध्ये उघडकीस आली. 


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवानंद फलके खराबवाडी येथे असलेल्या लुमॅक्स ॲन्सीलरी लिमिटेड कंपनीच्या गोडाउन मध्ये काम करतात . अज्ञात चोरट्यांनी 29 जुन ते10 जुलै च्या दरम्यान गोडाउन मध्ये कंपनित प्रवेश करून, गोडाउन मधुन कॉपर वायर , ब्राँस टर्मीनल असे एकुन 45 लाख 99 हजार 968 रुपयांचा ऐवज चोरून नेला . चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या