महानायक वसंतराव नाईक यांचा चाळीसगाव शहरात मोकळ्या जागेत पुर्णाकृती पुतळा बसविणे
बाबत मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांना निवेदन.
बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या मागणीला सर्व पक्षीय पाठिंबा.
शासनासह, आमदारांकडून कार्यवाही बाबत पत्र
----------------
चाळीसगाव (प्रतिनिधी)-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,महानायक , हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा चाळीसगाव शहरात होणे गरजेचे आहेत चाळीसगाव शहरातील मोकळ्या जागेत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन बंजारा समाज बहुउद्देशीय संस्था टाकळी प्र.चा.या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री त्याच सोबत आमदार ,खासदार,नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या मागणीला सर्व पक्षीय पाठिंबा मिळाला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी मोलाची अशी कामगिरी केली. ज्यांनी महाराष्ट्राची समृद्ध जडणघडण केली.व राज्य नावारुपास आणलं. महाराष्ट्राच्या शेतीमातीशी इमान राखत, महाराष्ट्राच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. सदैव शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे,माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा चाळीसगाव शहरात मोकळ्या जागेत किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात , महानायकांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी बंजारा समाज बहुउद्देशीय संस्था टाकळी प्र. चा .यांच्या वतीने अध्यक्ष-योगेश्वर राठोड यांच्यासह अशोक राठोड, गोरख गोफणे रुपसिंग जाधव, सुनील राठोड, भीमराव जाधव,दिनकरभाऊ राठोड राजू चव्हाण, कोमलसिंग जाधव, इंदल चव्हाण. अॅड.भरत चव्हाण या समाज बांधवांनी केली.
बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या मागणीला सर्व पक्षीय पाठिंबा. मिळाला असून मुख्यमंत्री कार्यालयासह ,आमदार मंगेश चव्हाण यांनी या निवेदनाची दखल घेतली आहे. याविषयी महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी उदय ना.सार्दळ यांनी D.A.O. जळगाव यांना, ई-मेल द्वारे सदर प्रकरणी नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी ,तसेच स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करण्याची विनंती केलेली आहे.तर चाळीसगाव चे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक व सचिवांना तातडीने पत्र देऊन समितीच्या आवारात जागा उपलब्ध करुन देणे बाबत व समीतीला कोणताही आर्थिक भार न पडू देता.पुतळा उभारणीसाठी स्वतः खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.
बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, जनआदोंलन समितीचे प्रा.गौतम निकम,विधानपरीषद आमदार, राजेश राठोड, अमोल मिटकरी,निलय नाईक,तुषार राठोड (नांदेड ) चाळीसगाव नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या सह राजेंद्र राठोड, मच्छींद्र राठोड व इतर पदाधिका-यांना निवेदन दिले आहे. बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या मागणीला सर्व पक्षीय पाठिंबा मिळाला आहे.
0 टिप्पण्या