कमीत कमी खर्चा मध्ये जास्तीत जास्त उत्पादन: जिरेनियम शेती

 मित्रांनो शेतकर्यांना बेभरवशाच्या पिकांना पर्याय म्हणून औषधी ,सुगंधी तेल वर्गीय पिकांची लागवड करणे फायदेशीर ही काळाची गरज आहे कारण शेतकरी शेतात राबून निसर्गाच्या लहरीपणा झेलून पिक हाती येते तेव्हा बाजारात भाव मिळत नाही त्यात भांडवलदारांचे सरकार ते पिक परदेशातून आयात करून शेतकरी कसा मरेल याची तरतूद करते. शेतकऱ्यांच्या अन्नधान्य वर पोसलेली नागरिक सुध्दा शेतकरी जन आंदोलनात सहभागी होताना दिसत नाही मग मात्र शेतकऱ्यांनी बदलले पाहिजे लोकांसाठी अन्नधान्य उत्पादन न करता औषधी,सुगंधी तेल वर्गीय पिकांची लागवड केली पाहिजे तेव्हा शेतकरी आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल

सुगंधी वनस्पतींमध्ये गवती चहा, जावा सिट्रोनेला, जिरॅनियम, तुळस, दवणा, वाळा यांच्या तेलाला बाजारपेठेत मागणी आहे तसेच औषधी वनस्पतींमध्ये अश्‍वगंधा, कळलावी, इसबगोल, खाजकुहिली, ज्येष्ठमध, रानवांगी, शतावरी, सदाफुली, सर्पगंधा, सफेद मुसळी या वनस्पतींना मागणी आहे


सोडा आता वार्षिक उत्पन्नाची आणि हमीभावाची चिंता.

 जिरेनियम शेती मधून कमवा वर्षाला पाच ते सहा लाखांची संधी

     जिरेनियम च्या लागवड चे फायदे

कमीत कमी खर्चा मध्ये जास्तीत जास्त उत्पादन.

कोणत्याही हंगामात लागवड करता येते.

कमीत कमी खतांचा व औषधांचा खर्च.

 कमीत कमी पाण्यावरची उत्पन्न घेता येते.

  कोणत्याही जमिनीमध्ये उत्तम प्रकारे पीक येते.

कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे औषधांचा खर्च नाही.

 या वनस्पतीला कोणतीही जनावरे गाई म्हशी शेळ्या खात नसल्यामुळे त्यांच्या पासून नुकसान नाही.

 या पिकावर प्रक्रिया करावयाचे असल्यामुळे चोरीला जाण्याची ही ताण नाही.

पारंपारिक पिकांमुळे जमिनीचा कस कमी झालेला आहे तो आपण या पिकामुळे परत एकदा वाढवू शकतो.



या औषधी वनस्पती पासून तयार केलेल्या तेलास भारतामध्ये व विविध देशांमध्ये सुद्धा प्रचंड मागणी आहे.

 एकरी फक्त एक लाख रुपये भांडवलामध्ये तीन ते पाच वर्ष आपण उत्पन्नच घेऊ शकतो.

 इतर सर्व बागायती पिकांपेक्षा या पिकांमध्ये हमखास उत्पन्न मिळण्याची खात्री आहे म्हणूनच जिरेनियम शेती इथून पुढील काळात फायद्याची ठरेल.


        जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे.याची अधिक माहिती ही सरकारच्या सुगंधी औषधी शेती विभागात मिळते.

      या वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन वर्ष उत्पादन मिळते.एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात.आणी हे पिक एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो.इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी आहे.या पिकामध्ये आंतरपिक म्हणुन शेवगा हे पिक उत्तम असते.या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो.

      या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते,व कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते.

       एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळते.एक लिटर ऑईलची किंमत जाग्यावर 12500  हजार रु मिळते. एक एकर मध्ये एका वर्षात चार ते पाच लाखाच ऑईल मिळते. एकरी उत्पादन सरासरी चार ते पाच लाख.

       या वनस्पतीची भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.हायडेनसिपरफ्यूम व कॉस्मेटिक साठी याचा वापर केला जातो.फरफ्युम मध्ये जी नॅचरिलीटी लागते ती या मधूनच मिळते.म्हणुन जिरेनियम शिवाय पर्याय नाही.

       या वनस्पतीची भारताची रिकवॉयरमेंट दर वर्षाला 200 ते  300 टनाची आहे.पण सध्यस्थिती पहाता भारतात वर्षाला दहा टन पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळ या आणी अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करण अधिक फायदेशीर ठरेल. 

      अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमिच आहे.हे पिक फायदयाचे आहे,यात कुठला घाटा किंवा फसवेगीरी नाही,अस खुद शेतक-यांचे म्हणने आहे.आणी हे पिक इनस्टंट अर्निंग देणार पिक आहे अस ही म्हणने आहे.

      यात सरकार आणि कृषी विभागानी लक्ष घातल तर नक्किच शेतकऱ्यांचा फायदा होईल.



प्रा गौतम निकम

जिजाई सेंद्रिय शेती करंजगाव ता चाळीसगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या