रक्षक न्यूज तर्फे सुरक्षा रक्षकांचा सन्मान..! २०१९ च्या भरती बद्दल सहाय्यक आयुक्तांशी चर्चा.
पुणे (प्रतिनिधी) दि. २ जून रोजी पुणे येथील सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब व मंडळातील अधिकारी कर्मचारी, तसेच ससून रुग्णालय येथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक यांना रक्षक न्यूज चॅनेलचे संपादक सतिष एस राठोड यांच्या हस्ते कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून चांगली कामगिरी केल्याबद्दल " समाज गौरव भूषण सन्मानपत्र " देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी ससून रुग्णालय भुलतज्ञ विभागाचे (एच.ओ.डी) डॉ. संयोगिता नाईक, अनिता जगताप , तुकाराम कुंभार,चंद्रकांत गायकवाड , पत्रकार परमेश्वर वाव्हळ, मनोज पवार, ससून रुग्णालयाचे एस ओ विनायक पाटील, वाघमारे, अन्य सहकारी मित्र सुरक्षा रक्षक व महिला सुरक्षा रक्षक सुद्धा उपस्थित होत्या. तसेच पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष निखिल वाळके, निरीक्षक कदम , दिपक काटकर , संजय आव्हाड, मंडळाचे सुरक्षा अधिकारी सुपेकर, वाल्हेकर, दुबे व अन्य कर्म
चारी वर्ग उपस्थित होते.
२०१९ च्या भरती बद्दल सहाय्यक आयुक्तांशी चर्चा.
पुणे मंडळात २०१९ या वर्षी सुरक्षा रक्षकांची झालेल्या भरतीचा निकाल अजून पर्यंत लावण्यात आलेले नसून पत्रकार सतिष एस राठोड यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांशी चर्चा केली असता कामगार आयुक्त माथाडी यांच्या सूचनेनुसार व अरक्षणानुसार भरती करण्यात येणार असे सहाय्यक कामगार आयुक्त वाळके यांनी सांगितले. आरक्षणानुसार भरती ही राज्यातील १५ मंडळांना लागू करण्यात आले असून माथाडी कामगार आयुक्त यांच्या सुचनेनुसार निकाल प्रक्रिया पार पडेल असे सांगितले.
२०१९ भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची आरक्षणानुसार भरती होत असल्यामुळे भरतीचा निकाल रखडले आहे. कोरोना सारख्या महामारीमुळे याला मोठा कालावधी लागणार असल्याने निकाल अजून रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शासनानेही भरती बाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.
0 टिप्पण्या