ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा
(जन्मदिनी वृक्ष
लावू अंगणी असा कौतुकास्पद उपक्रम)
चाळीसगांव : दि.०५ आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय - स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे." हे जाणणारे ओढरे येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले.
अशोक राठोड गेल्या काही दिवसांपासुन "जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी" असा स्तुत्य पर्यावरण स्नेही उपक्रम राबवित आहेत.सदर या दिनी त्यांचाही वाढदिवस असल्यामुळे या उपक्रमाला जोड दिली.मनात झाड लावल्याशिवाय जमिनित झाडे उगवणार नाही अशी विचारधारा ग्रामस्थांच्या मनात रुजवून नागरिकांनी आपला जन्मदिवस कळवावे.वाढदिवस वृक्ष लावून साजरा करण्यात येईल असे ग्रामस्थांना आवाहन केले. या वेळी पर्यावरण मित्र राकेश गवळी यांचे सहकार्य लाभले बत्यांच्या या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.म्हणुन सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या