शिरसगाव आरोग्य केंद्रात लसीकरण वरून गोंधळ...
आज सकाळी शिरसगाव येथील प्रा.आ.केंद्रात लसीकरण मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या नियोजनाअभावी गोंधळ उडाला. अगोदरच लाईन लाऊन टोकन घ्या,आणि मग लाईन मधे उभे राहून लस घ्या. एवढी मेहनत घेऊन सुध्दा लस नाही ऐकल्यावर लोकांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. एकीकडे सरकार लसिकरणासाठी जोर देतय, अन् इकडे लस नाही. आज चा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. यावेळी प. स. सभापती, शिरसगाव चे प. स. सदस्य, ग्रामसेवक इ. मंडळी उपस्थित होते. एवढ्या सगळ्याच्या उपस्थितीत सुध्दा गोंधळ सुरूच राहिला.शेवटी 1 पोलिस कर्मचारी बोलावण्यात आला.तेव्हा कुठं सुरळीत लसीकरण झाले
0 टिप्पण्या