कोरोना कालावधीत झालेल्या कारवाईत जमा केलेल्या दंडातुन अर्धी रक्कम पोलीस प्रशासनास सुपूर्द

 चैतन्य तांड्यांनी केलेल्या कारवाईतून पोलिस प्रशासनास ५० टक्के रक्कम अदा!    



चाळीसगाव
: कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चैतन्य तांडा व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विना मास्क धारकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून ५० टक्के रक्कम चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सुपूर्द करण्यात आले.

                          कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने विराम लॉन्स जवळील बायपासला विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हि कारवाई पोलिसांच्या मदतीने करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीपासून तर ५ मेपर्यंत केलेल्या कारवाईतून ३१०७० रूपये ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. या रक्कमेतून ५० टक्के १५५३५ रूपये चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना चैतन्य तांडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कैलास जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी हवालदार युवराज नाईक, चैतन्य तांडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक कैलास जाधव, सरपंच अनिता दिनकर राठोड करगाव विकास सोसायटीचे चेअरमन बाबू दादा मराठे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चव्हाण चैतन्य तांडा चे उपसरपंच आनंदा भाऊ राठोड ग्रामपंचायत सदस्य वसंत भाऊ राठोड ,प्रवीण चव्हाण व  करगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या