कोविड लसीचा ज्यादा पुरवठा करावा : रयत सेना


 सरकारी रुग्णालय व  खाजगी रुग्णालयाना कोवीड लस पुरवठा करा - जिल्हाअधिकाऱ्याना रयत सेनेची  निवेदनाद्वारे मागणी


चाळीसगाव - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आणि तिचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावरील लोकसंख्येचे लसीकरण गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने सरकारी रुग्णालय व  खाजगी रुग्णालयाना कोवीड लस जास्तीत जास्त पुरवठा करण्याची  जिल्हाअधिकारी यांना तहसील द्वारा  रयत सेनेने  निवेदनाद्वारे दि १२ रोजी मागणी केली आहे.

      शासनाच्या वतीने सरकारी रुग्णालयात नागरिकांना कोवीड लसीकरण होत आहे. मात्र तेथे नागरिकांची लसीकरणा  साठी मोठी गर्दी उसळली जात असल्याने कोरोनाचा धोका जास्त वाढण्याची शक्यता आहे शिवाय लस पुरेशा प्रमाणात नसल्याने कमीप्रमाणात  नागरिकांना लसीकरण केले जात आहे. असे असताना चाळीसगाव शहर व तालुक्यातील लोकसंख्या मोठी असल्याने लसीकरण लवकर होणार नाही. शासनाच्या वतीने या आगोदर काही खासगी रुग्णालयात लसीकरण दिले जात होते ते आता बंद करण्यात आले आहे.नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी  ठरावीक खाजगी रुग्णालयात कोवीड लस उपलब्ध झाल्यास कोवीड लसीकरण वेगाने होऊन कोरोनावर मात करता येणार आहे. म्हणून महाशय जिल्हाधिकारी यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून खाजगी रुग्णालयात पूर्ववत लस उपलब्ध करावी. तसेच सरकारी रुग्णालयात देखील लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे.म्हणून लसीचा मुबलक पुरवठा व्हावा जेणेकरून नागरिकांना तासनतास  लसीकरणा साठी लाईनत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने  सरकारी रुग्णालय व  खाजगी रुग्णालयाना कोवीड लस जास्तीत जास्त पुरवठा करण्याची  जिल्हाअधिकारी यांना तहसील द्वारा  रयत सेनेने  निवेदनाद्वारे दि १२ रोजी मागणी केली आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण,शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, छोटू आहिरे ,दीपक देशमुख,अमोल देठे, सचिन शिंदे शामकांत चव्हाण यांच्या सह्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या