महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राजा बढे यांच्या महाराष्ट्र गीताचे विविध २८ भाषेतून केलेले अनुवाद !!

 अनेक बोली व भाषेत वाचता येईल  गर्जना महाराष्ट्राची.

...........................................


चाळीसगाव (प्रतिनिधी)


महाराष्ट्र राज्याचा आज 61 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे .याचे औचित्य साधून 

   सुप्रसिद्ध  कवी,  राजाभाऊ बढे.यांनी लिहिलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे      विविध 28 बोली व भाषेत अनुवाद. करण्यात आले आहे. 

 महाराष्ट्र राज्यातील सहा प्रशासकीय विभागातील विविध जिल्ह्यातील  28 बोलीतून  अनुवादीत झालेला हा  उपक्रम फ्लिपबुक च्या माध्यमातून ऑनलाईन वाचता येईल. फ्लिप बुक आकर्षक मुखपृष्ठासह डांगाणी बोली अनुवादक रोहिदास डगळे-- खीरविरे,ता.अकोले, जि. अहमदनगर यांनी केलं आहे======


 

चाळीसगाव येथील उपक्रमशिल  प्राथमिक शिक्षक नितीन खंडाळे सर हे विविध मान्यवर कविंच्या कवितेचा अहिराणी बोली भाषेत अनुवाद करीत व विविध समाजमाध्यमातून ते प्रसिद्ध करीत होते.या छंदातून वाचकांना आनंद मिळत होता. खूप लोकांना हा उपक्रम आवडला. वाचकांनी भरभरुन  प्रतिसाद दिला.  व अनेक अनुवादक मित्रांच्या सहकार्याने त्यांनी माय 'मराठीच्या भगिनी बोलींच्या वारसांचा समूह'   या उद्देशाने मायबोली समुह तयार करुन कविता अनुवाद करण्याचा उल्लेखनीय उपक्रम सुरु केला. 

याच समुहाने सुप्रसिद्ध  कवी,  राजा बढे.यांनी लिहिलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे  28    विविध बोली व भाषेत अनुवाद..केले 

या कवितेचा 

१)अहिराणी बोली-नितीन खंडाळे

- चाळीसगाव जि.जनळगाव

२) लेवा गनबोली

डॉ.प्रशांत धांडे,फैजपूर

3) तडवी भिल बोली 

रमजान गुलाब तडवी -बोरखेडा खुर्द, ता.यावल(जळगाव)

==============

४) खानदेशी तावडी बोली

डॉ.प्रकाश सपकाळे

 जळगाव =============

५) बागलाणी अहिराणी बोली

वैभव तुपे

- जायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिक

==============

६) बंजारा गोरबोली

   एकनाथ गोफणे

- चाळीसगाव जि.जळगाव

==============

७) परदेशी बोली-

विजयराज सातगावकर

  -पाचोरा जि.जळगाव

==============

८) खानदेशी लेवा-गुजर बोली ममता पाटील

-शहादा जि नंदुरबार

==============

९) पोवारी अनुवाद-रणदीप बिसने

  - सिंदीपार जि. नागपूर

==============

१०) मराठवाडी बोली

डॉ. बालाजी मदन इंगळे 

- उमरगा, जि. उस्मानाबाद.

==============

११) वऱ्हाडी अनुवाद

अरविंद शिंगाडे - खामगाव जि.बुलडाणा

==============

१२) नगरी बोली

काकासाहेब वाळुंजकर

      - अहमदनगर

==============

१३) पंढरपूरी बोली

कृष्णा कांबळे

 - पंढरपूर जि.सोलापूर

==============

१४) झाडीबोली

पालिकचंद बिसने

लाखनी जि.भंडारा

==============

१५) आदिवासी मावची बोली

हर्षदा विनोद पराडके

  - नवापूर जि. नंदुरबार

==============

१६) बारली पावरी बोली

संतोष पावरा

 - शहादा जि.नंदूरबार

==============

१७) राठवी पावरी बोली

  अमित डुडवे

- चोपडा जि.जळगाव

==============

१८) डांगी बोली

भावेश बागूल

 - सुरगाणा, जि.नाशिक

==============

१९) डांगाणी बोली

रोहिदास डगळे

खीरविरे,ता.अकोले,==============

२०) मानकरी अनुवाद

 विठ्ठल ना. निरवारे

मल्हारा ता.अचलपूर जि.अमरावती

==============

२१) ठाकरी अनुवाद

    सोमनाथ उघडे

  - घाटघर जि.अहमदनगर

==============

२२) वारली अनुवाद 

राजन गरुड

      -पालघर

==============

२३) मालवणी अनुवाद

मेघना जोशी

     - मालवण

==============

२४) आगरी अनुवाद

तुषार म्हात्रे    - उरण जि.रायगड

==============

२५) वाडवळी बोली

  स्टॕन्ली गोन्सालविस

    - दक्षिण वसई 

==============

२६) दखनी अनुवाद

डी के शेख       

    - उस्मानाबाद

प्रो. हाशमबेग मिर्झा

     - सोलापूर

==============

२७) हिंदी अनुवाद

काकासाहेब वाळुंजकर

  - अहमदनगर

==============

२८) इंग्रजी अनुवाद

सुनिता उबाळे पठाडे

    - औरंगाबाद

==============


या अनुवादकांनी,  राष्ट्र चेतना निर्माण करणा-या कवी राजा बढे यांच्या कवितेचा अनुवाद  28 वेगवेगळ्या बोली व भाषेत करुन आज महाराष्ट्राला वर्धापनदिनानिमित्त   अभिवादन केले आहे.


यासंदर्भात  कवी एकनाथ गोफणे यांनी सांगितले की या  मायबोली समुहातील सदस्यांनी या आधी 

 बहिणाबाई चौधरी,  कवी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बा.सी.मर्ढेकर,  विरा राठोड, आबा महाजन आदींच्या कविता अनुवादीत केल्या आहेत.  

मालवणी बोलीच्या अनुवादक  मेघना जोशी यांच्या  बेडुकराव या बालकवितेचा  व शेख बिस्मिल्ला यांच्या बाबा या कवितेचा विविध बोलीत व भाषेतील  अनुवादाचं ऑनलाईन फ्लिप बुक तयार केलेले आहे.युवाकवी,मालिका कलावंत  दिनेश राठोड सह अनेक जण विविध अनुवाद उपक्रमात वेळोवेळी  सहभागी होत असतात.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या