चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास



चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये मेडिकल ऑक्सिजन गॅस ड्युरा सिलेंडर कार्यान्वित


चाळीसगाव ग्रामिण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास

चाळीसगाव कोव्हिड सेंटर मध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता पाहून  आदरणीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने व सिव्हिल सर्जन डॉ. ऐन. एस. चव्हाण यांच्या सौजन्याने दोन ऑक्सिजन गॅस ड्युरा सिलेंडर  कर्यांवयीत झाले यात प्रांत श्री. लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार श्री. अमोल मोरे साहेबांची मोलाची मदत झाली. डॉ. मंदार करंबेळकर यांनी तातडीने ड्युरा सिलेंडर पोहोचल्या वेळीच रात्री 12 वाजता श्री. निलेश गायकवाड यांच्या सत्यम ग्रुपच्या मदतीने सिलेंडर इच्छीत जागेवर हलवले. सिलेंडर बसवण्यासाठी पाईपलाईन मधील बदल श्री. सुनील साळुंखे यांनी रात्री 3 पर्यंत पूर्ण केले आणि चाळीसगाव तालुक्याच्याच नाही तर आजू बाजूच्या तालुक्यांनासुद्धा उपयोगी पडणाऱ्या कोव्हिड सेंटरला ड्युरा सिलेंडर कार्यान्वित झाले. त्यामुळे सिलेंडर भरण्यासाठी जाणारा वेळ आणि शक्ती वाचली, शिवाय रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या