माजलगाव : एन. एस. एल. शुगर जय महेश पवारवाडी हा कारखाना यावर्षी सुरुवातीपासूनच गेट केन उसाची आयात जास्त प्रमाणात करताना दिसत आहे. कारखान्याच्या 15 किलो मीटर कार्यक्षेत्रातील अनेक गावांना एकही बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर नसल्याचे शेतकर्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जय महेश शुगर कारखान्याच्या प्रशासनाकडे, अधिकार्यांकडे वारंवार विनंती केली. कार्यक्षेत्रातील ऊस पुर्ण गाळप झाल्यानंतरच गेट केन ऊसाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शेकापचे अॅड भाई नारायण गोले पाटील यांनी प्रशासनासह जयमहेश कारखाना व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या