👏 कोरोना टाळेबंदीमुळे 8 महिन्यांपासून बंद असलेली सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. दर्शन वा प्रार्थनेच्या वेळी मुखपट्टी वापरणे मात्र बंधनकारक असेल.
💁🏻♂️ हे' नियम पाळणं आवश्यक-▪ प्रार्थनास्थळांमध्ये असलेली मोकळी जागा, व्हेंटिलेशनची उपलब्धता या सर्व गोष्टींचा अभ्यास करून किती गर्दी प्रार्थनास्थळांमध्ये असायला हवी याचे नियोजन केले जावे.
▪️ प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याआधी चप्पल, बूट आपापल्या गाडीमध्येच काढून ठेवण्याची व्यवस्था करावी किंवा वेगळ्या ठिकाणी ठेवता येईल, अशी व्यवस्था करावी.
▪️ प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने हात आणि पाय स्वच्छ धुणे आवश्यक.
▪️ अन्य ठिकाणी जशी तोंडावर मास्क, सॅनिटायझेशन, सुरक्षित वावर याप्रकारची काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथेही घ्यावी.
▪️ दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फुटांचे अंतर राखणे बंधनकारक असेल, प्रार्थनागृहांतील गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
▪️ प्रार्थनास्थळांमध्ये मुखपट्टी वापरणे सक्तीचे
▪️ परिसरात कोविड विषयी जनजागृती करणारे माहिती फलक लावावेत. मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारी एखादी ऑडिओ कॅसेटही लावली जावी.
🙅🏻♂️ *ज्येष्ठ नागरिक, बालके, गर्भवतींना प्रवेशबंदी-* प्रार्थनास्थळे सुरू होत असली तरी त्यांत 65 वर्षांवरील नागरिक, 10 वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्रवेश देऊ नये किंवा त्यांनी तेथे जाणे टाळावे
0 टिप्पण्या