मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशन या जागतिक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज यांच्या हस्ते मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशन या जागतिक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले..


दिनांक ५ मार्च रोजी सातारा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळाची जागतिक संघटना मर्दानी खेळ वर्ल्ड फेडरेशन च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराजांनी पारंपरिक शिवकालीन मर्दानी खेळांविषयी संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत सविस्तर चर्चा केली आणि शासकीय पातळीवरील मान्यता मिळावी, खेलो इंडिया मध्ये आणि शालेय क्रीडा प्रकारात या खेळाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असे आश्वस्त केले.

या वेळी मर्दानी खेळ जागतिक महासंघ चे अध्यक्ष- संजय बनसोडे, सचिव- किरण अडागळे, खजिनदार- स्मिता धिवार, पदाधिकारी- डॉ. अजय नवले, रविराज चखाले, केतन नवले, डॉ. नितीन अरसुल, अभय नवले, मनोज गडकर सातारा जिल्हा मर्दानी खेळ असोसिएशन चे पदाधिकारी रोहित कांबळे, प्रज्वल मोरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या