हरिओम पब्लिक स्कूल दहिवद येथे आज 31डिसेंबर रोजी क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला

 हरिओम पब्लिक स्कूल दहिवद येथे आज 31डिसेंबर रोजी क्रीडा महोत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला

यावेळी कार्यक्रमा साठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष नानासो.भिमराव खलाणे, कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेचे प्रेरणा स्थान तात्यासो. पांडुरंग वाघ संचालक योगेश वाघ व आशिष खलाणे, मुख्यध्यापिका सौ.चेतना खलाणे, प्रि स्कूल मुख्यध्यापिका सौ. छाया पाटील यांच्या हस्ते फित कापून व दिप प्रज्वलन करण्यात आले. तद नंतर ऑलिंपिक खेळांचे प्रतीक असलेली मशाल मान्यवरांच्या हस्ते पेटवण्यात आली व शाळेच्या तीनही हाऊस तर्फे या मशालीचे भ्रमण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या सत्काराने करण्यात आली यावेळी इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी छान अशी कवायत सादर केली यानंतर शाळेच्या रेड ग्रीन व ब्ल्यू हाऊस तर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळांचे कुस्ती कबड्डी भालाप्रदर्शन भालाफेक तलवारबाजी लेझीम कलाकुसर चे खेळ बॅडमिंटन क्रिकेट खो खो बॉक्सिंग वेटलिफ्टिंग यासारख्या पारंपारिक व नाविन्यपूर्ण खेळांचे प्रदर्शन करून दाखवले. त्याचबरोबर *दिनांक 26/ 12/ 2022 पासून ते 30 /12 /2022 पर्यंत चालू असलेल्या क्रीडा आठवड्यात झालेल्या विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य, मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले* . यात क्रिकेट, खो खो, कबड्डी, हे इयत्ता सहावी ते नववीचे खेळ, 100 मीटर रनिंग, लहान वर्गातील बॉल कलेक्टिंग रेस, बलून रेस, जिलेबी इटिंग, बिस्किट इटिंग,  बकेट बॉल,  शेप जॉइनिंग, बिंदी स्टिकिंग अशा इयत्ता नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या वैविध्यपूर्ण खेळात प्रावीण्य दाखविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध प्रदर्शनासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब खलाणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व अशाच पद्धतीने अभ्यासासोबत क्रीडा प्रकारातही स्वतःच्या अंगी असलेली चूणुक  दाखवावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे शाळेचे संचालक श्री योगेश वाघ यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात क्रीडा प्रकारांचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले व विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मयूर इंगळे सर व नामदेव मोरे सर यांनी केले कार्यक्रमाची सांगता शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना खलाणे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.













.........................जाहिरात...........................





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या