रखडलेल्या विकासकामांच्या पुर्णत्वासाठी मनसेचा नगर परिषदवर मोर्चा
वाशिम - स्थानिक आनंदवाडी प्रभागातील रखडलेल्या कामांसह शहरातील इतर विकास ठिकाणची रखडलेली विकासकामे पुर्ण करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे यांच्या नेतृृत्वात सोमवार, १२ डिसेंबर रोजी नगर परिषदवर मोर्चा नेण्यात आला. यावेळी मुख्याधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, रखडलेल्या विकास कामांमुळे शहरातील विविध ठिकाणचा विकास खुंटला आहे. आनंदवाडी प्रभागातील विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. हे काम दुसर्या ठेकेदाराने टेंडर भरुनही अजुनही हाती घेतले नाही. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अकोला नाका ते पाटणी चौक रस्त्याचे काम थांबलेले आहे. पोस्ट ऑफीस ते तिरुपती सिटी रस्त्याची वारंवार दुरुस्ती करुनही हा रस्ता उखडत आहे. शहरातील पंचशिलनगरातील रस्ते, नाल्या व नंदीमंदिर परिसरातील रस्त्याचे काम अजूनही पुर्णपणे सुरु झालेले नाही. त्यामुळे शहरात अपघाताची मालीका सुरु असून विकासकामे पुर्ण होण्यासाठी वारंवार निवेदने व आंदोलने करुनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झोपलेल्या नगर परिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. जनभावना लक्षात घेवून नगर परिषदेने त्वरीत कामे पुर्ण करावीत अशी मागणी मनसेने केली आहे.
मोर्चामध्ये मनसेचे मालेगाव तालुकाध्यक्ष गजानन कुटे, उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, रिसोड तालुका सचिव धनीराम बाजड, जनहितचे तालुकाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, महेश देशपांडे, शेतकरी सेनेचे रघुनाथ खुपसे, वाशीम शहर उपाध्यक्ष गणेश इंगोले, शाखाध्यक्ष राजू शिराळ, शाखा संघटक देवा खरे, युवा नेतृत्व मोहन कोल्हे, महिला सेनेच्या मालेगाव संघटक बेबी कोरडे, वंदना अक्कर, प्रमिला इंगळे, कमल गायकवाड, जयश्री कांबळे, शमिनाबी लुकमान शहा, मीरा भगत, राधा गव्हाणे, संजीवनी भगत, सचिन दोडके, कडुबा गुडदे, योगीराज लाडवीकर, बबन गरड, सपाटे, गौरव तोष्णीवाल, विशाल गरकळ, रामेश्वर महाजन, शशिकलाबाई खडसे, कामिनी कांबळे, सिंधुबाई कांबळे, स्वाती राऊत, शांता इंगळे, संगीता तेलगोटे, मंदा लोंढे, मथुरा सरकटे, केसर बांगर, शोभा गुडघे, राहुल गुडदे, प्रमिला इंगळे, वर्षा कोहळे, लता बाजड, लता चोंडके, रेखा वानखेडे, पंचफुला ठोके, शोभा इंगळे, मनकर्णा पडघान, शिवाजी पडघान, शालिनी इंगळे, नैन्सी कांबळे, अनु खरे, शिला गुडदे, मोहन राऊत, ज्ञानेश्वर खरे, शंकर बांगर, सतीश इंगळे, प्रभू इंगळे, समा खरे, सागर खरे, अमोल तेलगोटे, राहुल मैंदकर, अमोल खडसे, पंकज मैंदकर, अमोल खरे, राहुल गुडदे, अजय घुगे, गजू बनसोड, जीवन वानखेडे, विशाल इंगोले, प्रकाश इंगळे, अविनाश तेलगोटे, शंकर भालेराव, गणेश शिंदे, रवी निकाळे, अक्षय खडसे, देवीदास खरे, महादेव खरे, महादेव गायकवाड, वसंता आढागळे, मयूर खडसे, रुद्रा विलास तेलगोटे, राहुल गुडदे, ऋतिक कांबळे, शुभम खरे, कुशल कांबळे, हर्षल खडसे आदींनी सहभाग घेतला. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.
0 टिप्पण्या