राजदेहरे किल्ला हनुमान मंदिर साफसफाई मोहीम.
निर्भय सेवा टीम कडून दि. 16 dec 2022 रोजी हनुमान मंदिर राजदेहरे किल्ला, ता. चाळीसगाव येथे साफसफाई मोहीम राबवण्यात आली.
या किल्ल्यावर बरेचशे पाण्याचे टाक, कुंड, बुरुज, गुंफा आणि प्राचीन कोरीव काम आहेत्.
हा किल्ला पुरातन विभाग आणि पर्यटन विभाग या दोनी कडून दुर्लक्षित राहिल्यामुळे बऱ्याच लोकांना याची माहिती नाही.
मार्गदर्शन फलक आणि साफसफाई ही नसते.
एक स्थानिक आणि जबाबदार नागरिक म्हणून निर्भय सेवा टीम तर्फे आम्ही राजदेहरे गावचे भूमिपुत्र अश्या मोहिमा राबवत असतो. कधी सह्याद्री प्रतिष्ठान बरोबर तर कधी वनविभागा बरोबर तर कधी स्वतः. उद्देश फक्त एकच आपल्या राजाची वास्तु आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीलाही पाहता यावी.
निर्भय सेवा टीम पवन म. राठोड, अमोल म. राठोड, पियुष ह. राठोड, वासुदेव म. राठोड, श्याम मोरे, भाऊसाहेब चव्हाण, अमोल राठोड उर्फ बबलू आणि अंकुश म. राठोड यांचे आभार🙏
संजय ममतू राठोड
निर्भय सेवा
संस्थापक अध्यक्ष
0 टिप्पण्या