जयंती दिनी गाडगे बाबांना भिलदरी तांडा येथील चिमुकल्यांकडून अनोखं अभिवादन

 जयंती दिनी गाडगे बाबांना भिलदरी तांडा येथील चिमुकल्यांकडून अनोखं अभिवादन


झाडूने परिसर आणि कीर्तनाने मन साफ करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त भिलदरी तांडा येथील संत सेवालाल महाराज मंदिराच्या परिसरात चिमुकल्यांकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

     सगळं आयुष्य ज्या महामानवाने समाजातील अपंग व दुर्लक्षित घटकांवर घालविले, 

     ज्या महामानवाने समाजात स्वच्छता व समृद्धी या दोन्ही गोष्टीवर जास्त भर दिला अश्या या महामानवास आज एक पिढी काळाच्या ओघात  विसरण्याच्या मार्गाने चालली आहे तर दुसरी कडे भिलदरी तांडा येथील चिमुकले यांनी गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छ्ता अभियान राबवून त्यांना अभिवादन केले.

  यावेळी चिमुकल्यांना गाडगे बाबा कोण होते हे ऋषिकेश भरत चव्हाण यांनी समजावून सांगितले याच प्रसंगि रुपेश राजेश चव्हाण, निकिता शिवाजी राठोड,जयेश भिला चव्हाण,विश्वास विक्रम राठोड या चिमुकल्यांनी भाषण केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या