सुरक्षा रक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बंजारा सेनेचा पाठींबा
आझाद मैदानात येथे पाचवा दिवस आमरण उपोषण सुरू, घरे, वेतन, वर्दी, भत्ता हवा घेणारच
मुंबई/ प्रतिनिधी राज्यातील सुरक्षारक्षकांनी 15 जिल्हे एकत्रीकरण सह इतर मागण्यांसाठी आजाद मैदान येथे 19 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
करसन राठोड म्हणाले की आम्ही बंजारा सेना तर्फे सुरक्षा रक्षक संघटनेला पूर्ण पाठींबा दिला असून आमचे सुरक्षा रक्षक सहकारी मित्र हे चार दिवसापासून उपोषणाला बसले आहेत अजून सरकारला जाग आली नाही
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर भूखंड उपलब्ध करून देऊन सुरक्षारक्षकांना कायम स्वरुपी घरे देण्यात यावी किंवा सिडको अथवा म्हाडा या शासकीय गृहनिर्माण मंडळाकडून अल्पदरात घरे उपलब्ध करून द्यावी जशी सिडकोकडून पोलीस कर्मचारी तसेच कोरोना योध्दानां घरे उपलब्ध करून दिली जावी. सुरक्षारक्षकांना 15 जिल्हे एकत्रीकरण करून द्यावे व त्यांचा वर्दीचा प्रश्न मार्गी लावावे,
पीएफ, पीएफ ऑफिसला जमा करण्यात यावे दोन वर्ष झाले अजून वेतन वाढ झालेली नाही.वेतनात वाढ करावी.
सर्व सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना आस्थपनेने बेरोजगार केले आहे जे आता वेटिंग लिस्टवर आहे अशा सुरक्षारक्षकांना मंडळाकडून बेरोजगार भत्ता मिळवून द्यावा व तात्काळ नोकरी देण्यास यावी. अशी मागणी बंजारा युवा सेनेचे अध्यक्ष करसन राठोड यांनी केले आहे
0 टिप्पण्या