कन्येच्या जन्मदिनी मोफत अभ्यासिका केंद्र मंगरुळच्या पीआयचा बोरगाव धांदे उपक्रम
प्रतिनिधी : सुशील सवाळे
मुलीच्या वाढदिवशी अनावश्यक खर्चाला फाट देत मुलामध्ये वाचन संस्कृती रुजावी, स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विध्यार्थीना यश मिळावे म्हणून मंगरूळ दस्तगीर येथील ठाणेदारानी स्वखर्चातुन कन्येच्या जन्मदिनी नवी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र सुरु केले.
ठाणेदार सुरज तेलगोटे हे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व एस डी पीओ जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबीर, महिलांना कायदेविषय माहिती वृक्ष संगोपनातून ऑक्सिजण पार्क असे विविध उपक्रम राबवत असतात.
यादरम्यान ग्रामीण विध्यार्थीना स्पर्ध्या परीक्षेची तयारी करता यावी म्हणून त्यांनी आतापर्यंत स्वखर्चाने मंगरूळ दस्तगीर, निभोंरा बोडखा येते स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरु केल्या. आदिवासी विध्यार्थीना हे दालन मिळावे म्हणून बोरगाव धादे येथे अभ्यासिका सुरु करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य सौं. जयश्रीताई धनंजय शेलोकर, सरपंच सौं. श्रुतीताई अंकुश उईके, उपसरपंच ऋषिकेश मस्के,ग्रामपंचायत सदस्य सौं. आम्रपाली सुशील सवाळे, सौं. रीनाताई मंगेश प्रजापती, श्रीमती. छायाबाई अंबादास कैलुके यांच्या उपस्थित विध्यार्थीना व्यक्तिमत्व विकासाचे, तर महात्मा जोतिबा फुले अभ्यासिकेला विविध पुस्तके उपलब्ध करून दिले.
0 टिप्पण्या