कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन
पालघर प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
गेल्या तीन वर्षांपासून कोकण विभाग अनेक संकटांशी मुकाबला करत आहे.
या सर्व संकटावर कोकण भूमीने आतापर्यंत धैर्याने मात केली आहे.
उदा. निसर्ग वादळ, कोरोनाचे थैमान, तौक्ते वादळ व आताची महापूराची परिस्थिती आपणासमोर आहे.
कोकणी माणूस अत्यंत नेटाने या सर्व परिस्थितीशी दोन हात करत आहेच.
यापूर्वीही महापूर , निसर्ग वादळ व कोरोना आणि आता पुन्हा एकदा महापुराने वेढलेल्या आपल्या या जन्म व कर्मभूमीसाठी मदतीचा हात देण्याचं आवाहन आपणांस करण्यात येत आहे.
चिपळूण परिसर , पोसरे (खेड),
संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि महाड व तळीये (महाड) जिल्हा रायगड व इतर पूरग्रस्त परिसरातील *पूरग्रस्तांना* संघटनेच्या व शक्य असल्यास शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून थेट आर्थिक स्वरूपात किंवा साहित्य रूपात मदत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
याबाबतचे नियोजन यथावकाश योग्य वेळी सर्वाना कळविण्यात येईलच.
या निधीतून शासनाच्या निकषामध्ये बसणाऱ्या पूरग्रस्तांपर्यंत संघटनेच्या वतीने मदत पुरविण्यात येणार आहे.
या मदतनिधी बाबत कोणावरही सक्ती केली जाणार नाही. स्वेच्छेने व यथाशक्ती आर्थिक स्वरुपातील मदत तालुका अध्यक्ष/सचिव/तालुक्यातील जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडे दि.10 ऑगस्टपर्यंत जमा करावी.
*याशिवाय आपणाला फारसा त्रास न घेता सहजगत्या मदत निधी जमा करण्यासाठी बँकेचे पुढील खाते उपलब्ध करून देत आहोत.दि 10 ऑगस्ट या तारखेपर्यंत या खात्यात मदतनिधी थेट रक्कम जमा करता येईल.*
-----------------------------------------------
मदतनिधी पाठविण्यासाठी बँक खात्याचा तपशील
NAME : DHANAJI
NANASAHEB PATIL
BANK : THE FEDERAL BANK
LTD
BRANCH : BHARANE NAKA
KHED, RATNAGIRI
A/C : 20650100044369
IFSC CODE : FDRL0002065
---------------------------------------------
हा निधी रोख वा जीवनावश्यक साहित्य या रुपात संबंधित पूरग्रस्त शिक्षक व इतरांपर्यंत पोहोचविण्याचं काम संघटनेच्या वतीने नियोजनपूर्वक करण्यात येईल.
*याबाबत मा आमदार श्री. कपिल पाटील साहेब व राज्याध्यक्ष श्री. अशोक बेलसरे सर व इतर* *पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.*
*यासाठी शिक्षक भारतीच्या सर्व विभागातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष/कार्यवाह व जिल्हा पदाधिकारी व प्रतिनिधी यांनी या कामी अधिकाधिक सक्रिय राहून सहकार्य करण्यास आग्रही विनंती आहे.*
याबाबत आम्हीही आपणाशी सतत संपर्कात रहात आहोतच.
तरी सर्व मा.मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींना पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देण्याचे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
कळावे.
आपले स्नेहांकित
श्री धनाजी पाटील कोकण विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रत्नागिरी
श्री संजय वेतुरेकर सर राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग
श्री अनिल शेलार सर जिल्हाध्यक्ष पालघर
श्री एकनाथ तारमळे सर,जिल्हाध्यक्ष ठाणे
श्री शंकरराव चव्हाण सर जिल्हाध्यक्ष, दक्षिण रायगड
श्री शरद निकुंभ जिल्हाध्यक्ष उत्तर रायगड
व
कोकण विभागीय जिल्हा पदाधिकारी
शिक्षक भारती महाराष्ट्र
0 टिप्पण्या