भोसरी : दारु पिताना कानशिलात लगावली म्हणुण तरुणाचा खुन; गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या मुलासह दोघांना अटक
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट
दारू पिताना झालेल्या भांडणातून तरुणाने दिवंगत गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या मुलाच्या कानशिलात लगावली . यावरून ' तु आमच्या भाईला का मारले ' , असे म्हणुण तरुणाचा शस्त्राने वार करून खुन केला. या प्रकरणी गोल्ड मॅन दत्ता फुगे यांच्या मुलासह साथीदारांना अटक करण्यात आली.
शुभम दत्ता फुगे (वय26 रा. भोसरी ) , प्रथमेश वायकर ( वय19 ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्याच्या सह विधीसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन सुरेश डांगळे ( वय27, रा. देवकर वस्ती, चक्रपानी वसाहत , भोसरी ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय25 ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहीतीनुसार , अमन डांगळे हा रात्री घराबाहेर पडला त्यानंतर तो आरोपी सोबत शुभम फुगे याच्या घराच्या टेरेसवर दारू प्यायला बसला . दारू पित असताना मयत अमन व आरोपी शुभम यांच्यात वाद झाला. त्यावेळी अमनने शुभमच्या कानशिलात लगावली.
या कारणावरून आरोपीनी 'आमच्या भाईचला का मारले ' . असे म्हणुण अमन यांना भोसरी गावातील विठ्ठल रखुमाई मंदीराजवळ नेले. तेथे तेथे आरोपींनी अमन डांगळे याच्या वर कोयत्याने वार केले. यात डांगळे याचा मृत्यु झाला.
सोमवार ( दि.26 ) सकाळी भोसरी गावात विठ्ठल रखुमाई मंदीराजवळ त्याचा मृतदेह आढळला. या गुन्हयाचा तपास करताना भोसरी पोलीसांनी दोन पथके तयार केली. व तपास सुरु केला . सराईत गुन्हेगार शुभम फुगे पलायन करण्याच्या बेतात असल्याची माहीती पोलीसांना मिळाली.
त्यानुसार पोलीसांनी शुभम याला ताब्यात घेतले त्याचा साथीदार प्रथमेश वायकर व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. आरोपी शुभम याच्या विरोधात यापुर्वी तीन तर विधी संघर्षित बालकाच्या विरोधास यापुर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.
0 टिप्पण्या