खेड येथील गुंड राहुल कल्याण वाडेकर याचा खुन वर्चस्व वादावरूनच
प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाटे
खेड येथील होलेवाडी (पाबळ) परीसरातील कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पु कल्याण वाडेकर (वय 28) याचा काल निघृण खुण करण्यात आला होता. पोलीसांनी या खुणाचा उलगडा केला असुन दोन आरोपीना अटक केली आहे . वर्चस्व वादातुन हा खुण झाल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे . स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकान यादोघांना अटक केली आहे .
जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे (वय 31 रा . तिन्हेवाडी रोड , जय गणेश सोसायटी , राजगुरूनगर ता. खेड ) आणी बंटी उर्फ विजय जगदाळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी मयत राहुलचा भाउ अतुल कल्याण वाडेकर यांनी फिर्याद दिली
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार राहुल उर्फ पप्पु वाडेकर हा सराईत गुन्हेगार आहे . त्याच्या वर खुण , खुणाचा प्रयत्न , खंडणी यासह 9 गुन्हे दाखल आहेत . 2011 मध्ये त्याने राजगुरुनगरचे माजी उपसरपंच सर्चान उर्फ पपा भंडलकर यांचा खुन केला होता . राहुल वाडेकर याच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या पार्श्वभुमीमुळे ग्रामीण पोलीसांनी त्याला तडीपार केले होते. काही दिवसापुर्वीच राहुल वाडेकर आणी राजगुरुनगर शहरातील मिलींद जगदाळे व टोळीशी वाद झाले होते . याच वादातुन सोमवारी पहाटेच्या सुमारास वरील आरोपींनी राहुल वाडेकर याला पाबळ परीसरात गाठले व गोळीबार त्याच्यावर दगडाने हल्ला करत त्याचा खुन केला .
दरम्यान स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस याचा तपास करत असताना त्यांना वरील आरोपी विषयी माहीती मिळाली होती त्यानंतर पोलीसांनी राजगुरूनगर शहरातुन त्याला पकडले त्याच्या कडे मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या आरोपीला देखील पकडण्यात यश आले .
0 टिप्पण्या