पूर्व वैमन्यस्यातुन होलेवाडी ता. खेड येथे तरुणांची निघृण हत्या

 पूर्व वैमन्यस्यातुन होलेवाडी ता. खेड येथे तरुणांची निघृण हत्या

प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट

खेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत होले वाडी ता. खेड येथील सत्यराम हौशीराम होले यांच्या शेतात राहूल उर्फ पप्पु कल्याण वाडेकर (वय 28 रा बहुळ ता खेड जि.पुणे ) याचा पिस्तुलातून गोळी झाडून धारदार शस्त्राने वार करून दगडाने ठेचुन खुन करण्यात आला

या प्रकरणी पोलीसांनी सचीन शाताराम पाटणे ,मिलिंद विठ्ठल जगदाळे, बंटी विठ्ठल जगदाळे, मयुर विठ्ठल जगदाळे, प्रवीण उर्फ मारुती थिगळे (सर्वजन रा थिगळस्थळ ता खेड जि. पुणे ) तौसीफ शेख (रा. दौंदे ता खेड ) व इतर काही अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मृत राहूलचा भाउ अतुल कल्याण वाडेकर (रा. बहुळ खेड जि पुणे ) याने खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

आरोपी सचीन पाटणे व मृत राहूल वाडेकर यांच्या मध्ये काही कारणा वरून वाद झाले होते याचा राग मनात धरुन वरील सर्व आरोपींनी राहूलची निघृण हत्या केली. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या