नमस्कार,
मी दिनेश राठोड
खरं तर सामाजिक, शैक्षणिक, साहित्य कलेच्या किंवा इतर माध्यमातून आपण एकमेकांच्या परिचयात आहोत. माणूसपणाच्या नात्यातून आपण एकमेकांना ओळखतोच..
आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलोय.. तो म्हणजे मूळ गावी म्हणजे बेलखेडा तांडा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथे स्थानिक युवकांच्या सहकार्यातून व लोकसहभागातून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या व शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. ५ सप्टेंबर २०२० मध्ये वाचनालय सुरू केले होते. या करिता परिचयातील अनेक दानशूर व्यक्तींनी खूप मोलाची मदत केली. याद्वारे टेबल, खुर्ची, पुस्तक वाचनालयाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या ते घेतले आहेत.
पण वाचनालयासाठी अजुन काही गोष्टीची आवश्यकता आहे.. पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट आणि NEET, JEE आणि स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी काही पुस्तकांची आवश्यकता आहे.
*कृपया तुमच्याकडून काही मदत होत असेल तर नक्की कळवा.. जास्त काही नाही.. तुम्ही एक पुस्तक जरी पाठवलात तरी चालेल.. तुमच्याकडे जुने पुस्तकं असतील तर चालतील..*
*पत्ता*
तरुणाई अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र,
बेलखेडा तांडा, पोस्ट. नागद
ता. कन्नड जि. औरंगाबाद
पिन कोड नं. 431103
मो. न. 7391939846
(दिनेश राठोड)
0 टिप्पण्या