तौक्तेच्या चक्रीवादळात चाळीसगावच्या सुपुत्राने केले
कौतुकास्पद कार्य
मुंबई : देशभरासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले असून त्या संकटातुन सावरत असतानाच महाराष्ट्रसह, गुजरात, गोवा आणि समुद्र किनारी असलेल्या राज्यांना तौक्ते चक्रीवादळाचा कहर पडला यात जीवितहानी कमी प्रमाणात झाली असली तरी वित्तहानी बऱ्याच प्रमाणात झाली यात वीज वितरण कंपनीचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं असून कोठे वीजखांब , तर कोठे विजतारा तुटल्या असून त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे
यात चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र श्री करुणासागर मोरे (विद्युत ठेकेदार) यांनी मुख्य अभियता दीपक कुंमटेकर साहेब, फारूक शेख साहेब, संदीप शेडगे साहेब ( कार्यकारी अभियंता , चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात , आणि वसई तालुक्यात बऱ्याच प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे
जळगाव परिमंडळ चाळीसगाव वीज विभागातर्फे त्यांचे विशेष कौतुक केले असून आम्ही देखील त्यांना सॅल्यूट करतो
असेच मागे गेल्या वर्षीदेखील त्यांनी मुंबई परिसरात दापोली खेड पालघर इत्यादी ठिकाणी वीज वितरण कंपनीस सहकार्य केले असून त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे
0 टिप्पण्या