रस्त्यावरील खड्ड्यात पडून तरुण जखमी, प्रशासनाचा भोंगळ कारभार

 महामार्ग विभागाचा  निष्काळजीपणा मुळे जीवितहानी होण्याची शक्यता

 

एका तरुणाचे प्राण बचावले, नागरिकांनी व्यक्त केला संताप





चाळीसगाव: आज दिनांक 30  एप्रिल रोजी रात्री 7:40 वाजेच्या सुमारास श्री. निंबा विठ्ठल गवळी वय  36  रा. नवीन नाका हिरापूर रोड चाळीसगाव हा  मोटरसायकलने आपल्या घरी जात असताना रस्त्यावरील पाण्याचा वाल असलेल्या खड्यात अंधार असल्यामुळे पडला , त्यावेळी  वारा पाऊसाचे वातावरण असल्यामुळे परिसरातील वीज गेलेली होती त्यातच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट देखील बंद होते त्यामुळे रस्त्यावर असलेला खड्डा रस्ते विभागाच्या निष्काळजीपणाने,   कोणतीही सुरक्षा उपाययोजना नसलेला खड्ड्यात सदर तरुण पडून गंभीरपणे जखमी झाला सुदैवाने जीवित हानी टळली  , त्याच वेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते माणुसकी धर्माने त्यास  त्वरित रुग्णालयात दाखल केले , झालेल्या घटनेमुळे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा होणाऱ्या वित, जीवितहानीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करीत दिला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या