दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटपासाठी पारोळा येथे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिर संपन्न..
.
नगराध्यक्ष करनदादा पवार, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील, नगरसेविका अंजली पाटील मान्यवरांची उपस्थिती...
पारोळा ---- देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाने जळगाव लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यात मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन आज पारोळा येथील ग्रामीण रुग्णालयातील शिबिराचे उद्घाटन उमंग महिला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे हस्ते तसेच नगरसेविका अंजलीताई करनदादा पवार यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संपदाताई पाटील यांनी दिव्यांग बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती शिबिरात उपस्थित दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर होण्यासाठी दिली. याप्रसंगी नगराध्यक्ष करन दादा पवार, माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, डॉ.सूर्यवंशी, गटविकास अधिकारी श्री लोंढे ,नगरसेवक भैयाभाऊ चौधरी, शिबिराचे समन्वयक नगरसेवक पी जी पाटील, डॉ.जयश्री निकम,दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष नवल पाटील,दिव्यांग आघाडीचे शहराध्यक्ष ज्ञानेश्र्वर पाटील, सामाजिक कार्यकर्ते विवेकदादा पाटील, कैलास पाटील, दिनेश लोहार,गणेश महाजन,संकेत पाटील, ईश्वर ठाकूर, यश ठाकूर, प्रसाद महाजन, पांडुरंग पाटील, स्वामी निकम, उद्योजक मल्हार कुंभार,अनिल चव्हाण , मोहंमद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना दिला आधार
नगराध्यक्ष करनदादा पवार, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदाताई पाटील, नगरसेविका अंजली पाटील आदी मान्यवरांनी प्रत्येक दिव्याग बधू भगिनी, लहान थोर सर्वांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समस्या समजावून घेतल्या. दिव्याग बंधू भगिनींची, मुलांची काळजी घेणाऱ्या पालकांचे व स्वयंसेवकांचे आधार देणाऱ्या कार्यकर्त्यांचे संपदाताई पाटील यांनी विशेष आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या