365 दिवसात 370 किल्ले आणि ते ही सायकल वर....महाराष्ट्र गडकिल्ले ते माऊंट एवरेस्ट मोहीम.
अशी आगळी वेगळी मोहीम पूर्ण करून वर्ल्ड रेकॉर्ड करू पाहणाऱ्या 24 वर्षीय अवलीयचे नाव आहे सुबोध गांगुर्डे.
सुबोध हा मूळचा ता. रोहा जि. रायगड. व्यवसायानी गिर्यारोहक असणारा सुबोध महाराष्ट्रातील गड कोट संवर्धन जनजागृती साठी 370 किल्ले सर करून नंतर माऊंट एवरेस्ट वर भगवा फडकवणार आहे.
26 नोव्हेंबर 2022 ला त्याने या प्रवासाला सुरवात केली, आता पर्यंत 80 दिवसात 114 किल्ले त्याने सर केले आहेत.
त्याच्या या प्रवासात जेव्हा तो ता. चाळीसगाव येथील राजदेहरे किल्ला सर करण्यासाठी आला तेव्हा निर्भय सेवा या सामाजिक सांगठनेचे अध्य्क्ष संजय ममतू राठोड, सहकारी पवन म. राठोड आणि नेमीचंद का. राठोड यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना राजदेहरे किल्ला सर करण्यात मदत करून त्यांना किल्ल्या विषयी माहिती दिली.
संगठणे तर्फे केल्या जाणाऱ्या समाजिक कार्य आणी किल्ले संवर्धना विषयी सुद्धा त्यांनी या वेळेस माहिती दिली.
एक आदरातीर्थ म्हणून सुबोध चा निर्भय सेवा आणि राजदेहरे ग्रामस्थान कडून सत्कार करण्यात आला.
या वेळी निर्भय सेवा चे अध्यक्ष संजय ममतू राठोड, कार्याध्यक्ष ममतू मा. राठोड, निर्भय सेवा परिवाराचे ममराज झा. राठोड, पवन म. राठोड, नेमीचंद का. राठोड, वासुदेव म. राठोड, अमोल म. राठोड, अमोल भा. राठोड (लाल्या) आणि सह्याद्री प्रतिष्ठांचे समीर शिंपी उपस्थित होते.
प्रत्येक गावांनी जर त्यांच्या परिसरात असलेल्या गड किल्ले आणि प्राचीन वास्तु चे संवर्धन जर केले तर या वास्तु चिर काळा पर्यंत टिकतील असे मत निर्भय सेवा चे अध्यक्ष संजय ममतू राठोड यांनी मांडले.
पुढचा पाहुणचार नंतर सुबोधला पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देऊन निरोप घेतला.
0 टिप्पण्या