आदिवासी साहित्य अकादमी महाराष्ट्र चे पुरस्कार जाहीर


चाळीसगावप्रतिनिधी : आदिवासी साहित्य अकादमी महाराष्ट्र दर दोन वर्षांनी आदिवासी आदिवासी साहित्य, आदिवासी बोली भाषा, आदिवासी कला, आदिवासी संक्रुति जतन व्हावी. आदिवासी जीवन समाजापर्यत पोहचलं गेलं पाहिजे. व्यवस्था चा तळाचा घटक सामाजिक प्रवाहासोबत यायला हवा. आजपर्यंत आदिवासी साहित्य ची दखल कोणतेही संस्था  नें (एक दोन अपवाद वघळता )वा शासन घेतांना दिसत नाही. बारा वर्षापासून आदिवासी साहित्य अकादमी कोणतेही शासकीय अनुदान न घेता कार्यकर्ता च्या माध्यमांनें आदिवासी साहित्याला दोन वर्षांनी पुरस्कार प्रदान करित  असते.

       नव्याने प्रकाशित होणाऱ्या कलाक्रुती मधून आदिवासीयत , आदिम जीवन मूल्य व आदिवासी बोली चा वापर याचा  निकषावर काव्य, कथा -कादंबरी, विद्रोही साहित्यिक व आदिवासी युवा साहित्य पुरस्कार जाहीर करते.

   या वर्षी प्राचार्य विश्वास पडोळे सें यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती प्रा. जितेंद्र सोनवणे, राकेश  खैरनार रमजान तडवी प्रा. योजना निकम व वंदना मोरे  यांनी सदर साहित्यक्रुती निवडून खालील पुरस्कार जाहीर केले.

 कवी विरसिंग पाडवी काव्य पुरस्कार:-प्रब्रम्हानंद मडावी,चंद्रपूर (बफरझोन)1100/अक्षरी आकरासे रुपये रोख सन्मानचिन्ह 

भुजंग मेश्राम कथा-कादंबरी साहित्य पुरस्कार डॉ. कृष्णा भवारी , सांगली 1100/ आकरासें रुपये रोख व सन्मानचिन्ह

विद्रोही साहित्यिक पुरस्कार:-दिनेश चव्हाण खान्देश

1100/अक्षरी आकरासे रुपये रोख व सन्मानचिन्ह....


प्रतापभाऊ युवा साहित्य पुरस्कार... साहित्यक्रुती उपलब्धता न झाल्याने सदर पुरस्कार राखून ठेवलाय....

      आदिवासी साहित्य अकादमी चे  नियोजित पुढील वर्षी होणाऱ्या सहावे राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनात सदर पुरस्कार देण्यात येतील किंवा करोना ची परिस्थिती निर्माण झाल्यास (अपवादात्मक स्थिती झाल्यास)पुरस्कार समिती चा निर्णय घेऊन योग्य कार्यवांही केली जाईल....किंवा पोस्टाने वितरित केले जातील... कळावे...

             सुनील गायकवाड

                 अध्यक्ष

    आदिवासी साहित्य अकादमी महाराष्ट्र (चाळीसगाव)

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या