चाळीसगाव येथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेची बैठक संपन्न

 


चाळीसगाव प्रतिनिधी

          दि.२०.१२.२०२१ रोजी सोमवारी दुपारी १२.०० वाजता रेस्ट हाऊस स्टेशन रोड चाळीसगाव येथे तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

          सदर बैठकीत ऑक्टोबर पासून बंद झालेला कोरोना प्रोत्साहन भत्ता,जुलै २०२१ पासून झालेली मानधन वाढ, आरोग्य वर्धिनीच्या कामाचा मोबदला,भाऊबीज भेट, किमान वेतन, मोबाईल रिचार्ज यासह आगामी आंदोलनाबाबत संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.

          बैठकीमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबत सकारात्मक उत्तर देत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना संघटनेची कशी गरज आहे याचे महत्त्व पटवून दिले.

         त्यावर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तालुक्यातील सर्व आशाताई आणि गटप्रवर्तकांना मुख्य प्रवाहात आणून संघटना आणखीनच भक्कम करण्याचा निर्धार केला.

    बैठकीत तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बहुसंख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या