चौथ्या कल्याण ट्रॉफी स्केटिंग चॅम्पियनशीप - 2021 स्पर्धेत घानवळ ता.मोखाडाच्या कु.उत्कर्षा रामदास गाडर हिची सुवर्ण पदकाला गवसणी
प्रतिनिधी - हेमंत घाटाळ
दि.19/12/2021 रोजी चौथी कल्याण ट्रॉफी - स्केटिंग चॅम्पियनशीप - 2021 स्पर्धा शहाड ता.कल्याण येथे स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका यांच्या आयोजनाने व रिजन्सी ग्रुपच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली.
सदरच्या स्पर्धेत 4 वर्षे वयोगटापासून ते खुल्या वयोगटातील क्वाड आणि इनलाईन स्पीड स्केटिंग इव्हेंट पार पडल्या. स्पर्धेत ठाणे,मुबंई,नाशिक,पालघर येथून शेकडो खेळाडू सहभाग घेत असतात.या स्केटिंग स्पर्धेत कु.उत्कर्षा रामदास गाडर ( 6 ते 8 वयोगट ) आणि कु.दक्षतनया रामदास गाडर ( 8 ते 10 वयोगटमध्ये ) मु.घानवळ पो.बेरिस्ते ता.मोखाडा जि.पालघर यांनी मोखाडा तालुका व पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत कु.उत्कर्षा रामदास गाडर हिने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळवले तर कु.दक्षतनया रामदास गाडर हिने स्पर्धेत घसरून पडून देखील पाचवा क्रमांक पटकावून उत्तेजनार्थचे पदक मिळवले. त्यांना हे पदक आंतरराष्ट्रीय कराटेपट्टू श्री.स्वप्नील सर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
स्केटिंग खेळातील या दमदार कामगिरीमुळे घानवळच्या गाडर भगिनींचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या