आली दिवाळी,माझ्या शाळेच्या दारी उपक्रम घायपातपाडा शाळेत साजरा...

 आली दिवाळी,माझ्या शाळेच्या दारी उपक्रम घायपातपाडा शाळेत साजरा...


प्रतिनिधी : हेमंत घाटाळ

घायपातपाडा शाळेत झाला दिवाळी उत्सव साजरा.पाड्या-खेड्यावर काम करत असताना,आपल्या व्यावसायिक बांधिलकीसह सामाजिक बांधिलकी जपत,जि.प.शाळा घायपातपाडा येथे दिवाळी पूरक उपक्रम घेऊन दिवाळी उत्सव साजरा करण्याचा शाळेने प्रयत्न केला.दिवाळी सणाचे सांस्कृतिक महत्व विशद करणारे दिवे, कंदील,सुशोभन आणि स्वछता यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती घेता आली.कोरोना चे संकट गेले दीड वर्ष होऊन गेले तरी आपल्यावर घोंगावत आहे.तालुक्या पासून दुर्गम असणाऱ्या या शाळेत ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्क सोडाच...पोहोचण्यासाठी जीवाची कसरत करावी लागते.अश्या जागतिक महामारीच्या संकटात ही नेटवर्किंग समस्या जाणून इथे कार्यरत असणारे शिक्षक कोरोनाचे नियम पाळत व पालकांच्या सहकार्याने गेली दीड वर्ष शाळेच्या शिक्षणाची ज्ञानज्योत तेवत ठेवत आहेत. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने जाऊन मुलांची शाळा भरून मुलांना मार्गदर्शन करण्यात आणि शालेय गुणवत्ता अबाधीत ठेवण्यात इथे कार्यरत असणाऱ्या सौ.शेलार मॅडम व श्री.शिरसाठ सर यांचं कौतुक करावं इतकं कमी आहे.जीव वाचवण्याच्या काळात या दोन्ही अध्यापकांनी चालू ठेवलेले प्रभावी वाचन-लेखन व बौद्धिक उपक्रम नेहमी कौतुकप्रिय असतात. या दोघांना वेळोवेळी केंद्रप्रमुख श्री.भगवान जाधव साहेब यांचे मार्गदर्शन लाभत असते.आज याच शाळेत सुट्टी कालावधीत साजरा झालेला दिवाळी उत्सव चर्चेचा विषय ठरत आहे.आपल्याच जवळील उपलब्ध मातीपासून पणत्या,रंगीत कागदापासून कंदिल,दार तोरणांचे ब पणत्यांचे रंगकाम असे विविध कौशल्य पूर्ण उपक्रम आज शाळेत घेण्यात आले.आज सुट्टी असूनही पाड्या वरील मुलांना दिवाळी उत्सव साजरा करण्याची पर्वणी लाभली. त्याबद्दल श्री.सुनीता शेलार मॅडम व श्री.शांताराम शिरसाठ सर आपल्या शैक्षणिक व सामाजिक घडणीच्या योगदानासाठी सलाम..




टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या