आदिवासी शिक्षक पात्र उमेदवारांची तीव्र भूमिका दि.26 तारखेपासून आंदोलन सुरूच. दि .1 नोव्हेंबर लाँग मार्च वर्षा बंगल्यावर.
प्रतिनिधी : हेमंत घाटाळ
पालघर जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य द्वार जवळ आदिवासी शिक्षक पात्रता उमेदवारांची मुंडण आंदोलन ही केले. शिक्षक पात्र उमेदवारांची भरती करावी या मागणीसाठी गेले दि.26 ऑक्टोबर पासून हे आंदोलन सुरू आहे. आदिवासी डी एड ,बीएड, विद्यार्थी पालघर जिल्हा परिषदेच्या समोर, कलेक्टर ऑफिसच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण साखळी उपोषण चालू केले आहे.आठ सदस्य बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.आठ सदस्यांचे प्रकृती अत्यंत गंभीर स्वरूपाची होताना दिसत आहे.ह्या कडे प्रशासन अद्यापही गांभीर्याने पाहत नसल्याने मुंडण आंदोलनही सुरू केलं. दरम्यान आंदोलनाच्या वेळी लता सानप यांनी उलटसुलट उत्तरे दिल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. लता सानप आदिवासी भागात काम करतात हे त्यांनी विसरू नये. आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा गैरवापर करून आंदोलकांना उद्धट उत्तर देऊन, पारा चढण्यापेक्षा त्यांचा विकास करावा त्यासाठी आदिवासी जनतेला हक्क द्यावा. जोपर्यंत न्याय मिळत नाही ,तोपर्यंत हा लढा चालूच राहील . असे आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष , समिती यांनी या ठिकाणी सांगितले .
कोकण विभागातील आयुक्तांनी तपासून दिलेल्या 1662 रिक्त पदांची मागणी समितीच्या सदस्यांकडे आहे परंतु भरती प्रस्तावात 1468 जागा दाखवून 194 जागा कुठे गेल्या?असा सवाल उपस्थित केला. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. पेशा कायदा व राज्यपाल यांच्या अधिसूचनेची अमलबजावणीच काय झाले .आरक्षण कायद्या कुठे गेला. अशी अनेक आंदोलक कर्त्याचे प्रश्नावली निर्माण झाली आहे.ह्या मुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून.
दरम्यान निवेदन देत असतानाच जिल्हाधिकारी दत्ता सानप यांचा पारा चढला त्यानंतर सानप मॅडम आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली पेशा शिक्षक भरती करा नाहीतर खुर्ची खाली करा. राज्यपालांच्या अधिसूचनाचे अंमलबजावणी झालीच पाहिजे. नोकरी आमच्या हक्काचे नाही. कुणाच्या बापाच्या अशा घोषणा देऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडले .अनुसूचित जमाती विशेष शिक्षक भरतीवर शालेय शिक्षण व वित्त विभागाची मंजुरी मिळत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे इशारा देण्यात आला लता सानप यांच्या सोबत शाब्दिक चकमक झाल्यानंतर आदिवासी समाजाची अवहेलना ,कमी लेखणे ह्यामुळे आंदोलकांनी त्यांच्याकडे निवेदन न देता उप जिल्हाधिकारी जनाठे यांच्याकडे देण्यात आले .
पालघर जिल्ह्यातील शिक्षक पात्र अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया तात्काळ राबवावे ,अशी आश्वासने अनेक राजकीय मंडळी आणि प्रशासक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेकडो आश्वासने दिली. त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान मागील उपोषणा नंतर 40 दिवसानी ही भरती संदर्भात पुढील कारवाई होत नसल्यामुळे हे आज आंदोलन करीत असल्याचे कृती समिती म्हटले आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्थी करून शिक्षक विभागांनी तातडीने व उमेदवारांची भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे आदेश दिल्यानंतर ही कारवाई. झाली नाही.
दि.26 ऑक्टोबर मंगळवार पासून हे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यामध्ये महिलांचा समावेश त्यांची लहान मुलांचा समावेश आहे. गरोदर मातांचा ही समावेश आहे. अशा अनेक बिकट प्रसंगी भगिनी पात्र शिक्षक उमेदवार आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा. सीईओ साहेब होश मे आव होश मे आव .अशी घोषणा बाजी करून उमेदवारांनी आपले आंदोलन हे तीव्र स्वरूपात धारण केले आहे.
ह्या प्रसंगी पालघर जिल्हा शिक्षक भारती आपल्या सोबत असून उपोषण आंदोलकांना आपल्या मागण्या ह्या रास्त आहेत . जिल्हा अध्यक्ष ह्यानी शिक्षकांचे कैवारी मान.आमदार कपिल पाटील साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून मौळे यांच्याशी संपर्क करून दिला .आमदार साहेबानी उपोषण मागे घ्या. अन्याय बाबत दुःख व्यक्त केले. त्वरित माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई यांच्याशी संपर्क साधून वर्षाताई यांनी आश्वासन दिले . उपोषण मागे घ्या .मात्र आमदार साहेबांनी यासंदर्भात मी स्वतः जातीने लक्ष देईन .ही बाब खूप गंभीर आहे. तुमच्यावर अन्याय झालेला आहे. हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले. त्यावेळी कृती समितीचे अध्यक्ष ह्यांनी साहेबांचे आभार मानले. आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो , आपण शिक्षकांचे कैवारी आहात .असा विश्वास उपोषण कर्त्यानी दाखविला.
दरम्यान निवेदन पालघर जिल्हा अध्यक्ष अनिल शेलार.ह्यानी मार्गदर्शन केले प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले यांचा प्रश्न मार्गी लागेल.असे सांगितले.
ह्यावेळी उपाध्यक्ष. हेमंत घाटाळ. जिल्हा संघटक रक्त कर्ण किरण थोरात .सातपुते .महेश भुसारा . सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित निवेदन देऊन आपल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा आहे. त्यामुळे आंदोलकांनी घोषणा बाजी केली.
0 टिप्पण्या