पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका मधील कोगदा गावाचे डॉ. अजय काशिनाथ डोके यांचे संघ लोक सेवा आयोग (UPSC) मध्ये उत्तुंग यश. .

 जव्हार मधील कोगद्याच्या डॉ.अजय काशिराम डोके यांचे संघ लोक सेवा आयोगात (UPSC) मध्ये उत्तुंग यश...


मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर.


       डॉ.अजय डोके हे बालपणापासूनच  मेहनती होते. जि.प. शाळा कोगदे - 1  ता . जव्हार येथे 1ली ते इ. 4 थी पर्यंतचे शिक्षण झाले. शिकत असतांना विविधगुण स्पर्धेतसाठी अजय लहान असतानाच अवकाशकन्या कल्पना चावला यांच्याविषयी भाषण दिले होते. विज्ञानातील ॲरॉनॉटीक , स्पेस पायलट सारखे अतिशय अवघड शब्द , संकल्पना असलेलं भाषण त्याने सहज मुखोदगत करून वक्तृत्व स्पर्धेत तालुका स्तरापर्यंत मजल मारली होती.

        ५ वी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रकल्प कार्यालय - जव्हार यांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून 6 वी ला नामांकीत शाळा ब्रम्हाव्हॅली ता.त्र्यंबकेश्वर  जि.. नाशिक येथे प्रवेश मिळविला.ब्रम्हा व्हॅली येथील शालेय प्रवेश हाच अजयच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. शाळेत 6 वी ते 12 वी पर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही.१२ वी सायन्समध्ये घवघवीत यश मिळवून  के. ई.एम . वैद्यकीय महाविद्यालय परळ - मुंंबई 12 येथे MBBS चे वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.आंतरवासिता सुरु असतानांच अजय यांनी Upsc परीक्षा दिली होती.  डॉ.अजय डोके यांनी मानाचा समजला जाणारा केंद्रीय लोक सेवा आयोगाचा (UPSC परीक्षा) गड कोणताही क्लास न लावता अथक मेहनत, जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे सर केला आहे. डॉ. अजय डोके यांचे हे स्पर्धा परीक्षेतील उत्तुंग यश ग्रामीण व शहरी भागातील स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले असून ते त्यांचे रोल मॉडेल ठरले आहेत. डॉ.अजय डोके यांनी मिळवलेल्या UPSC परीक्षेतील यशामुळे त्यांनी जव्हार तालुका आणि पर्यायाने पालघर जिल्ह्याचे नाव उंचावले आहेत. त्यांच्या अथक परिश्रमपूर्वक मिळवलेल्या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


 ("अजय हा प्रतिभासंपन्न, शांत , संवेदनशील ,मितभाषी , प्रेमळ स्वभावाचा विद्यार्थी असून त्याला जि.प.शाळा - कोगदा ता.जव्हार येथे शिकवायला होतो. प्रचंड जिद्द, अपरिमित परिश्रम आणि संयम यामुळे अजय आज एक सनदी अधिकारी झाला  याचा सार्थ अभिमान असून हा माझ्या शिक्षकी पेशातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण  आहे. डॉ. अजय डोके यांचे मी मनापासून अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो." )

  डॉ.रवी बुधर

पदवीधर शिक्षक

जि. प . प्राथ. व माध्य . शाळा चौक ता.जव्हार.)



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. डॉ. अजय डोके यांची UPSC पर्यंतची वाटचाल खूपच प्रेरणादायी आणि मेहनतीची आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन.!!
    👍👌👌

    उत्तर द्याहटवा