आदर्श कलाशिक्षक विजय जोगमार्गे यांना "गुरू गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित.

 आदर्श कलाशिक्षक विजय जोगमार्गे यांना "गुरू गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित.


प्रतिनिधी : हेमंत घाटाळ

आदरणीय श्री.  विजय जोकमार्गे सर. हे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व एक अप्रतिम  कलाशिक्षक उत्कृष्ट असे लेखन .कथा. काव्य. वाङमय इत्यादी त्यांचं उत्कृष्ट लेखन  संपादक.

 चित्रकार.फलक लेखन. इ.

 पालघर जिल्ह्यातील  आदर्श कलाशिक्षक विजय जोगमार्ग यांना गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुणे येथील आर्ट बिट्स फाउंडेशन महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेने दिला जाणारा "गुरु गौरव" पुरस्कार वाडा तालुक्यातील आदर्श कलाशिक्षक विजय जोगमागे यांना देण्यात आला आहे .आर्ट बिट्स संस्था दरवर्षी कलाक्षेत्रात विशेष प्रावीण्य कार्य करणाऱ्या कला शिक्षकांना गुरू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करते. यावर्षी वाडा तालुक्यातील अस्पी विद्यालय उच्चाट येथील कलाशिक्षक विजय जोगमार्गे यांना आर्ट बिट्स फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी" गुरू गौरव "पुरस्कार दिल्याने जाहीर केले आहे. जोगमार्गे सर कलाशिक्षक म्हणून गेली बत्तीस वर्ष सेवा करीत आहे .पोस्टर ,फलक लेखन इत्यादी करून जनजागृती करत असतात.

      सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य अद्याप करीत असून कला विषयावरील मार्गदर्शन, पुस्तके प्रकाशित ही केली आहे. वाड्मयीन लेखनातील दहा पुस्तकेही प्रकाशित झाली आहे .याची दखल घेत आर्ट बिट्स फाउंडेशन यांनी गुरू गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या या 32 वर्षांमध्ये केलेल्या कार्याचा सहभाग त्यांच्या सौ. धर्मपत्नी गुरुमाऊली यांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे.

त्यांच्या या कार्याला पालघर जिल्ह्यामध्ये गुरू गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आजी-माजी विद्यार्थी कर्मचारी व कला शिक्षकांकडून . कला बांधवांकडून .कलाप्रेमी कडून   समाज बांधवांकडून. पालघर जिल्हा शिक्षक भारती .अध्यक्ष अनिल शेलार.शिक्षक भारती परिवारा कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या