भारत बंद शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
प्रतिनिधी : बाळा निकम
चोपडा येथे यवल रोड वर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको करून घोषना देत आंदोलन करण्यात आले त्याच प्रमाने अंकलेश्वर - ब्रहानपूर रस्त्यावर, गलंगी फाट्यावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करून दिल्ली येथे. चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी भररस्त्यात कार्यकर्त्यांनी ठाण मांडून काही काळासाठी वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्यावर लांबच लांब वाहनांची रांग दोन्ही बाजूला लागली. जमलेल्या जनसमुदाय पुढे,अनेर काठ संघर्ष समितीचे समन्वयक प्रा.प्रदीप पाटील,शेतकरी नेते एस.बी. नाना , प्रदेश सचिव एन.
एस.यु.आय. महाराष्ट्र राज्य चेतन बाविस्कर,शहराध्यक्ष कॉंग्रेस के .डी .चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, आदींनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. तीन काळे कृषी कायदे रद्द करा. महागाई कमी करा. अशा विविध स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या. केंद्र सरकार विरुद्ध घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला , आज 27 सप्टेंबर च्या भारत बंदला पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी, कामगारांनी, शेतमजुरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याचे दिसून येत होते. यावेळी प्रमोद पाटील, आदी अनेकांची उपस्थिती लक्षणीय यावेळेस तूषार पाटील, मयुर पाटील, राजेंद्र पाटील ,निलेश पाटील ,लक्ष्मण पाटील ,देवकांत चौधरी ,रमाकांत सोनवणे, तालुकाध्यक्ष एन.एस.यु.आय.चोपडा सोहन सोनवणे, गणेश पाटील ,नितेश पाटील, विजय शिरसाठ, शैलेश पाटील, जगदीश पाटील, किशोर दुसाने, संतोष कोळी, विठ्ठल कोळी, सूर्यकांत रायसिंग ,विनायक कोळी,संदीप दादा,भट्टू सोनवणे ,संजय कोळी ,विपिन नेरपगारे, रवींद्र बोरसे प्रदीप नेरपगारे, जीवन बागुल आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या