पाच मिनिटात दुचाकी लंपास

चक्कर आल्याने रस्त्याच्या बाजूला डोळे मिटून थांबलेल्या दुचाकीस्वारांची अवघ्या पाच मिनिटात दुचाकी चोरीला .


प्रतिनिधी : योगेश ( विकास ) अल्हाट

दुचाकीवरुन जात असताना दुचाकीस्वाराला चक्कर आली .त्यामुळे त्याने रस्त्याच्या बाजूला दुचाकी थांबवून पाच मिनिटे डोळे झाकून घेतले या पाच मिनिटात अज्ञात चोरट्यांनी त्याची दुचाकी चोरून नेली . ही घटना 30 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता च्या सुमारास दापोडी येथे घडली  येथे घडली .


धोंडीराम दगडू देसक (वय 42 रा . गणेश पेठ पुणे )यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला


यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे धोंडीराम 30 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मेगा मार्ट ते सि एम ई कॉलेजच्या गेट दरम्यान दापोडी येथून जात असताना अचानक चक्कर येऊ लागल्याने त्यांनी त्यांची दुचाकी ( एम एच 12 T G 6809 रस्त्याच्या बाजूला थांबवली फिर्यादी रस्त्याच्या बाजूला खाली उतरले आणि पाच मिनिटे डोळे मिटून थांबले . या पाच मिनिटात कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीचे मोपेड दुचाकी चोरून नेली . भोसरी पोलीस तपास करीत आहेत .


मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . त्यामध्ये भोसरी एकूण 2 तर हिंजवडी परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. तसेच वाकड परिसरातुन एका इको गाडीचा सायलंसर सुद्धा चोरीला गेलेची तक्रार आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या