देवळी आश्रमशाळेत वनसंवर्धन दिनानिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन
नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे वनसंवर्धन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री.सतीष पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार यांनी वृक्ष दिंडीचे स्वागत केले.
वनसंवर्धन दिनानिमित्त शाळेत वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आलेली होते. तसेच वृक्षाचा आकारात विद्यार्थ्यांनी बसून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. तसेच शाळेत व शालेय परिसरात शंभर रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास मुख्याध्यापक अधीक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री. ज्ञानेश्वर पाटील श्री. भूषण बहिरम तसेच सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



0 टिप्पण्या